Gunaratna Sadavarte-Pune Band | पुण्यातील मुक मोर्चावर गुणरत्न सदावर्तेंची वेगळीच मागणी, म्हणाले…

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – Gunaratna Sadavarte-Pune Band | पुण्यात विविध संघटना आणि राजकीय पक्षांनी एकत्र येत ‘पुणे बंद मूक मोर्चा’ काढला आहे. मंगळवारी (दि. 13 डिसेंबर) पुणे शहर बंद ठेवण्यात आले. या बंदला नागरिकांकडून तसेच व्यापार्‍यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. पुण्यातील रस्त्यांवर शुकशुकाट पहायला मिळाला. जागोजागी पोलीस देखील तैनात होते. आता या बंद आणि मोर्चावर वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यातील मूक मोर्चा हा बेकायदेशीर आहे, असे गुणरत्न सदावर्ते म्हणाले आहेत. (Gunaratna Sadavarte-Pune Band)

या मोर्चात भाजप उदयनराजे भोसले आणि शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे सहभागी झाल्या.
उदयनराजे भोसले यांना अटक करा अशी मागणी देखील सदावर्ते (Gunaratna Sadavarte-Pune Band)
यांनी केली आहे. पुण्यात पाळण्यात आलेला बंद आणि मुकमोर्चा बेकायदेशीर आहे असे म्हणत, वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उदयनराजे भोसले यांच्या अटकेची मागणी केली. त्यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
बंद बेकायदेशीर आहेत, असे सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा सांगूनही हा बंद पुकारण्यात आला.
या बंदमुळे कष्टकऱ्यांच्या पोटावर पाय आला आहे. त्यामुळे उदयनराजेंना अटक केली जावी, असे सदावर्ते म्हणाले आहेत.

भगतसिंग कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह
विधाने केल्याच्या निषेधार्थ पुण्यात आज (मंगळवारी) बंद पाळला जात आहे.
या बंदला अनेक संघटना, पक्ष आणि नागरिकांनी पाठिंबा दिला आहे.

Web Title :- Gunaratna Sadavarte-Pune Band | gunaratna sadavarte demanded arrest bjp mp udayanraje bhosale regarding pune band

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Khandala Ghat Accident-Anda Point | सहलीसाठी आलेल्या बसचा अपघात होऊन 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू; खंडाळा घाटातील घटना

Maharashtrachi Hasyajatra-Sachin Goswami | ‘बोटाला शाई लावण्याच्या वेळी सावध आणि विचार पूर्वक कृती केली पाहिजे’; चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेक प्रकरणावर दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांची अप्रत्यक्ष टीका