Maharashtrachi Hasyajatra-Sachin Goswami | ‘बोटाला शाई लावण्याच्या वेळी सावध आणि विचार पूर्वक कृती केली पाहिजे’; चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेक प्रकरणावर दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांची अप्रत्यक्ष टीका

पोलीसनामा ऑनलाइन : Maharashtrachi Hasyajatra-Sachin Goswami | पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली. यानंतर राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसत आहे. या प्रकरणावर अनेकांनी त्यांच्या प्रतिक्रिया उमटवल्या होत्या. या प्रकरणात पोलीस बंदोबस्त असतानाही हा प्रकार घडल्याने पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी 11 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित देखील केले होते. तर आता या घटनेवर महाराष्ट्राची हास्य जत्राचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी अप्रत्यक्षरीत्या टीका केली आहे. (Maharashtrachi Hasyajatra-Sachin Goswami)

फेसबुक वर पोस्ट शेअर करत सचिन गोस्वामी म्हणाले, “थोडक्यात महत्वाचे… बोटाला शाई लावण्याच्या वेळी सावध आणि विचार पूर्वक कृती केली पाहिजे “. त्यांनी या पोस्टमध्ये कोणाचेही नाव न घेता अप्रत्यक्षरीत्या ही पोस्ट शेअर केली आहे. सध्या त्यांच्या या पोस्टवर अनेक लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. तर एका युजरने “बरोबर…… नाही तर तोंडावर शाई फेकण्याची वेळ येईल” अशी कमेंट केली. तर एका दुसऱ्या युजरने “शाई लावणाऱ्याला अक्कल पाहिजे ना सर तेवढी…!” असे म्हटले आहे. (Maharashtrachi Hasyajatra-Sachin Goswami)

काय घडले होते नेमके?

चंद्रकांत पाटील यांच्यावर शनिवारी सायंकाळी चिंचवड येथे शाईफेक करण्यात आली.
पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती.

Web Title :- Maharashtrachi Hasyajatra-Sachin Goswami | maharashtrachi hasyajatra director sachin goswami facebook post ink throwing on chandrakant patill

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Patan Crime | अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍या तरूणावर पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल

Ajit Pawar | मराठवाड्यासह विदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी हिवाळी अधिवेशनाचा कालवाधी 3 आठवडे करा; अजित पवारांची मागणी