×
Homeताज्या बातम्याGunaratna Sadavarte | गुणरत्न सदावर्तेंच्या पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडचा राडा, अंगावर शाईफेक

Gunaratna Sadavarte | गुणरत्न सदावर्तेंच्या पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडचा राडा, अंगावर शाईफेक

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) उस्मानाबादमध्ये स्वतंत्र मराठवाडा राज्य निर्मितीच्या मागणीसाठी आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलले. त्यावेळी, स्वतंत्र्य मराठवाडाच नाही, तर मुंबई देखील केंद्रशासित करुन दाखवू, असे विधान वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी केले होते. तसेच पवार, चव्हाण आणि देशमुख ही तीन कुटुंबे मराठवड्याचे मारेकरी आहेत, असे देखील सदावर्ते म्हणाले होते. त्यानंतर शनिवारी सोलापूर येथील कार्यक्रमादरम्यान सदावर्ते यांच्यावर शाईफेक झाली आहे. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी ही शाईफेक केली आहे.

गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) सोलापूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते, त्यादरम्यान त्यांच्या मागे उभ्या असलेल्या एका व्यक्तीने त्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरु केली. संयोजकांनी त्याला पकडले असता, त्या व्यक्तीच्या मागे उभा असलेल्या दुसऱ्या कार्यकर्त्याने त्याच्या खिशातून शाई काढून सदावर्ते यांच्या अंगावर फेकली, आणि काळे कापड दाखवत घोषणाबाजी केली. दोघेही संभाजी ब्रिगेड संघटनेचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी गुणरत्न सदावर्ते महाराष्ट्राचे तुकडे करत असल्याचा आरोप करत त्यांच्या वेगळ्या राज्यांच्या मागण्यांचा निषेध केला. यावेळी, सदावर्तेंच्या मराठा आरक्षणालाही असलेल्या विरोधाचा निषेध ही केला गेला.

संभाजी ब्रिगेडची भूमिका स्पष्ट करत ब्रिगेडचे कार्यकर्ते सोमनाथ राऊत म्हणाले,
“आज भारतीय संविधान दिवस आहे. गुणरत्न सदावर्ते छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,
महात्मा फुले, शाहु महाराज आणि सर्व महापुरुषांच्या महाराष्ट्राचे तुकडे करायला निघाले आहेत.
त्यामुळे सदावर्तेंना महाराष्ट्रात कुठेही फिरू देणार नाही हीच संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे.
आम्ही सदावर्तेंच्या अंगावर काळी शाई फेकली आणि काळे कापड दाखवून निषेध केला आहे.
हे सदावर्ते बोलत नसून ते भाजपाचं पिल्लू आहे. भाजपने महाराष्ट्र तोडायचा ठरवलं आहे.
आम्ही हे होऊ देणार नाही. महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेड चळवळ अजून जीवंत आहे, हे आम्ही भाजपाच्या पिल्लाला सांगू इच्छितो.”

Web Title :-   Gunaratna Sadavarte | sambhaji brigade spray ink on adv gunratna sadavarte in solapur

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | महिलेचा अश्लील व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करुन केला व्हायरल, उत्तर प्रदेशातील तरुणावर FIR

Pune Police | पुण्यात नाईट ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचार्‍याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Chandrakant Patil On Maharashtra Karnataka Border Issue | सीमावादावरील गावांसाठी 2 दिवसांत मोठी घोषणा – चंद्रकांत पाटील

Must Read
Related News