Gunaratna Sadavarte | सदावर्तेंची गाडी फोडणाऱ्या तरुणाची जोरदार चर्चा, कोण आहे सरपंच मंगेश साबळे? वाचा

छत्रपती संभाजीनगर : मुंबईतील परळ येथे मराठा आंदोलकांनी (Maratha Reservation) एक मराठा लाख मराठा घोषणा देत वादग्रस्त वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांची गाडी आज सकाळी फोडली. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले असले तरी यापैकी एका नावाची मोठी चर्चा सध्या सुरू आहे, ते म्हणजे सरपंच मंगेश साबळे (Sarpanch Mangesh Sable). (Gunaratna Sadavarte)

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात असलेल्या गेवराई पायगाव येथील सरपंच मंगेश साबळे या तरुणाने ही तोडफोड केल्याचे समोर आले आहे. मंगेश साबळे हे गेवराई पायगावचे सरपंच आहेत. अनेक आक्रमक आंदोलनामध्ये त्यांचे नाव यापूर्वी चर्चेत आले आहे.

तहसिल कार्यालयासमोर उधळले होते पैसे
अधिकारी विहीर खोदण्यासाठी शेतकऱ्यांकडून पैसे मागत असल्याचा आरोप करत मंगेश साबळे यांनी काही दिवसांपूर्वी फुलंब्री तहसील कार्यालयासमोर (Phulumbri Tehsil Office) चक्क दोन लाख रुपये उधळले होते. मंगेश साबळे यांनी विहिरींची कामे दिले होती. मात्र, ती कामे पैसे दिल्याशिवाय होत नसल्यामुळे पैसे उधळले होते. (Gunaratna Sadavarte)

स्वताची कार जाळणारे हेच ते साबळे
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले असताना
पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला होता. यामध्ये अनेक महिला व पुरुष जखमी झाले.
यानंतर घटनेचे पडसाद राज्यभरात उमटले. या घटनेचा निषेध करण्यासाठी संभाजीनगर येथे मंगेश साबळे यांनी
आपली नवीकोरी कार पेट्रोल टाकून जाळली होती. यावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrakant Patil | मंत्री चंद्रकांत पाटील हे मिलिंद तुळाणकर यांच्या जलतरंगाने प्रभावित

Uddhav Thackeray | महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या पीएम मोदींना उद्धव ठाकरेंची विनंती, ”त्यांचे स्वागत आहे, त्यांनी..!”