न्यूयॉर्कमध्ये ख्रिसमस कॉन्सर्टमध्ये गोळीबार करणारा ठार

ADV

न्यूयॉर्क : न्यूयॉर्क येथील कॅथेड्रल ख्रिसमस कॉन्सर्टच्या बाहेर पोलिसांवर गोळीबार करणार्‍या माथेफिरु पोलिसांच्या गोळीबारात ठार झाला. ख्रिसमसनिमित्ताने कॅथेड्रल चर्चमध्ये एका संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोविड १९ च्या नियमांचे पालन करुन या कार्यक्रमाला सुमारे २०० जण उपस्थित होते. रविवारी दुपारी कार्यक्रम संपल्यानंतर एक माथेफिरु आपल्याबरोबर गॅसोलिन, रोप, वायर, टेप येऊन आला. त्याने पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरु केला. त्याने जवळपास २० गोळ्या झाडल्या. पोलिसांनी त्याला प्रतिउत्तर देत गोळीबार केला. त्यात तो जखमी झाला. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यु झाला. या माथेफिरुची ओळख अद्याप पटलेली नाही.

या कॉन्सर्टमध्ये सहभागी झालेल्यांना हा मोठा धक्का होता. पोलिसांनी त्याला वेळीच रोखले नसते, तर येथे मोठी मनुष्यहानी झाली असती, असे कॉन्सर्टमध्ये सहभागी झालेल्यांनी सांगितले. हल्लेखोराने अमेरिकेच्या नकाशा असलेला मास्क घातला होता. त्याच्या पाठीवर एक सॅकही होती. त्यात शस्त्रे होती. पोलिसांना घटनास्थळावर दोन पिस्तुले आढळून आली.