Har Har Mahadev | बॉक्स ऑफिसवर ‘हर हर महादेव’चा जयघोष! पहिल्याच दिवशी चित्रपटाने जमवला कोट्यवधीचा गल्ला!

मुंबई : अभिनेता सुबोध भावेचा (Actor Subodh Bhave) ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (Box Office) जादू केली आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत. ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 2.25 कोटींचा गल्ला जमवला आहे.

या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे निर्मात्यांनी म्हटले आहे. निर्मात्यांनी स्वतः ही बातमी चाहत्यांसोबत शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. सोशल मीडियावर, स्वराज्याच्या सुवर्णगाथेला प्रेक्षकांचा हाऊसफुल्ल (Housefull) प्रतिसाद, असे कॅप्शन देत पोस्ट शेअर करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि बाजीप्रभू देशपांडे (Baji Prabhu Deshpande) यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे.

हर हर महादेव (Har Har Mahadev) चित्रपट फक्त मराठीतच नव्हे तर तब्बल 5 भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित
झाला आहे. मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड या पाच भाषांमधून हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
सुलतानी अंधार पसरलेला असताना जिजाऊंनी स्वातंत्र्याचे पाहिलेले स्वप्न,
बारा हजार शत्रूंवर विजय मिळवणारे आपले तीनशे मावळे आणि बाजीप्रभूंचे झुंजार कर्तृत्व दाखवणारा हा चित्रपट
आहे. हा चित्रपट खास दिवाळीच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

हर हर महादेव चित्रपटात सुबोध भावे, शरद केळकर (Sharad Kelkar), अमृता खानविलकर
(Amrita Khanwilkar) हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 25 ऑक्टोबरपासून ’हर हर महादेव’ चित्रपट
गृहात प्रदर्शित झाला आहे. पाच भारतीय भाषांमध्ये एकाच दिवशी प्रदर्शित होणारा हा पहिलाच मराठी चित्रपट
(Marathi Movies) आहे.

Web Title :- Har Har Mahadev | subodh bhave sharad kelkar and amruta khanvilkar starrer har har mahadev movie box office collection day 1

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shinde-Fadnavis Government | दिवाळी संपताच शिंदे-फडणवीस सरकार पुन्हा करणार मोठे प्रशासकीय फेरबदल

Sanjay Aggarwal | ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाच्या पुणे शहर प्रसिद्धीप्रमुखपदी संजय अगरवाल