सुवर्णसंधी ! HCL कंपनी देणार 1000 जणांना नोकरी; ‘या’ तारखांना होणार व्हर्च्यूअल नोकरभरती

विजयवाडा : वृत्तसंस्था – आयटी क्षेत्रातील सर्वात मोठी असलेली कंपनी एचसीएल टेक्नॉलॉजीने (HCL Technologies) येणाऱ्या १२ आणि १३ फेब्रुवारीमध्ये व्हर्च्युअल रिक्रुटमेंट ड्राइव्हचं (virtual recruitment drive) आयोजन केलं आहे. माध्यमिक शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी, आणि IT प्रोफेशनल् अशा सर्वाना यामध्ये संधी आहे. यामध्ये कंपनीने १००० उमेदवारांसाठी नोकरी देणार असल्याचं सांगितलं आहे.

पदवीचं शिक्षण पूर्ण केलेले फ्रेशर, २ ते ८ वर्षांचा अनुभव असलेले, तसेच Java, चीप डिझायनिंग, डॉटनेट, अझूर, सॅप, पायथॉन आणि इतर कौशल्यांमध्ये कुशल असलेले आणि अनुभवीही या ड्राइव्हमध्ये संधी मिळणार आहे. गन्नावरम सेंटरमध्ये आणखी ५००० जणांची भरती होणार आहे. सध्या याठिकाणी १५०० कर्मचारी आहेत. विशेष म्हणजे आताच्या कर्मचाऱ्यांपैकी ९० टक्के विजयवाडा आणि आजूबाजूच्या परिसरातील आहेत. ‘सरकारशी करार करूनही आम्ही विद्यार्थ्यांना शिक्षण देतो आम्ही अशा पद्धतीने १००० जणांना प्रशिक्षण देऊ शकतो. आपल्या घराजवळच इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, ॲप्लिकेशन आणि प्रोडक्ट डेव्हलपमेंट (Engineering Services, Applications and Product Development) विषयांतील करिअर करता येते अशी माहिती कंपनीच्या कॉर्पोरेट उपाध्यक्षा आणि न्यू व्हिस्टास प्रकल्पाच्या संचालिका श्रीमती शिवशंकर यांनी दिली आहे.

तर HCL ने आधी सुरू केलेल्या टेकबी उपक्रमाअंतर्गत माध्यमिक परीक्षांमध्ये ६५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेला उमेदवार एका वर्षाच्या प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकतो. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर एंट्री लेव्हलचा जॉब त्याला कंपनीकडून मिळू शकतो. या प्रशिक्षणादरम्यान आपलं स्किल दाखवणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्याची संधीही कंपनी देते. बिट्स पिलानी किंवा सास्रा विद्यापीठातून हे विध्यार्थी पुढचं शिक्षण घेऊ शकतात. तर आतापर्यंत सुमारे ७५० विद्यार्थ्यांनी टेकबी उपक्रमासाठी नाव नोंदणी केली आहे. असे शिवशंकर यांनी सांगितले आहे. तसेच HCL कंपनीने दिलेल्या संधीचा फ्रेशर्स आणि इतर प्रोफेशनल्सनी उपयोग करून घावा असे आवाहन त्यांनी केले आहे. तर अधिक माहितीसाठी कंपनीची वेबसाईट hcltech.com हि दिली आहे.