‘हा’ अभिनेता होणार ‘BIG B’ यांचा मुलगा; सोशल मीडियावर केलं लिक

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   ‘थप्पड’ चित्रपटातून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला अभिनेता पवैल गुलाटी आता एका नव्या भूमिकेतून आपल्या समोर येणार आहे. लवकरच तो अमिताभ बच्चन यांच्यासोबत चित्रपटात दिसणार आहे.

बोललीवूडचा अभिनेता पवैल गुलाटी लवकरच दिग्दर्शक विकास बहलच्या आगामी ‘गुडबाय’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट बालाजी टेलिफिल्म्स आणि रिलायन्स एंटरटेनमेंट यांची निर्मिती आहे. या चित्रपटात तो अमिताभ यांच्या मुलाची भूमिका साकारणार आहे तर यात दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंधानाही दिसणार आहे. पवैलने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन याबद्दल माहिती दिली आहे. त्याने गुडबाय हा चित्रपट आपल्यासाठी खास असल्याचं म्हटलं आहे.