Coronavirus : ‘कोरोना’चा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर सुद्धा शरीरात असलेल्या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  एका रिपोर्टनुसार काही लोकांच्या कोरोना टेस्टचा रिपोर्ट शरीरात लक्षणे असूनही निगेटिव्ह येतो. मात्र आरटी-पीसीआर टेस्ट सर्वात विश्वासू टेस्ट आहेत. कोणतीही टेस्ट 100 टक्के अचूक नसते. जर तुम्ही कोविड-19 पॉझिटिव्ह आहात अणि दुसर्‍यांदा टेस्ट केल्यानंतर रिपोर्ट निगेटिव्ह येत आहे, परंतु तुमच्यात लक्षणे अजूनही असतील तर सतर्क व्हा. अशावेळी स्वत:ला आयसोलेट करा. असलेल्या लक्षणांना मॉनिटरिंग करा.

ही आहेत लक्षणे :

* वास आणि चव घेण्याची शक्ती परत न येणे

* घशात खवखव आणि खोकला

* ताप येणे

* सर्दी कायम राहणे

* थकवा जाणवणे

लक्षणे असूनही टेस्ट निगेटिव्ह येणे प्रत्यक्षात खुप धोकादयक ठरू शकते. यामुळे व्हायरस आणखी वेगाने पसरू शकतो. काही मानवी चुकांमुळे सुद्धा रिपोर्ट निगेटिव्ह येण्याचे प्रमाण जास्त आहे. वायरल लोड खुप कमी असणे हे सुद्धा एक कारण आहे.

अशी घ्या काळजी

* घरातील इतर सदस्यांपासून वेगळे रहा. जोपर्यंत लक्षणं संपत नाहीत आयसोलेट रहा.

* ऑक्सीमीटरने श्वास आणि थर्मामीटरने ताप चेक करत रहा.

* दुसर्‍यांदा टेस्ट करायची असेल तर सल्ला दिला जात आहे की, असे पहिल्या टेस्टच्या 3-4 दिवसानंतर करा.