Home Isolation Tips : होम आयसोलेशनच्या दरम्यान ‘या’ 9 गोष्टींकडे ठेवा विशेष लक्ष, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – बेड उपलब्ध नसल्याने कमी लक्षणे असलेल्या रूग्णांना होम आयसोलेशन ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे. यासाठी नवीन गाईडलाईन जारी केली आहे. यामध्ये व्यक्तीला लागोपाठ 3 दिवस ताप न आल्यास होम आयसोलेशनमधून बाहेर येण्याची परवानगी आहे. याशिवाय, इतर अनेक निर्देश देण्यात आले आहेत. कोरोना व्हायरसच्या किरकोळ लक्षणांनी पीडित व्यक्तीने घरात कसे राहावे आणि कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे ते जाणून घेवूयात…

हे लक्षात ठेवा
1- किरकोळ लक्षणे असल्यास होम आयसोलेट व्हा. या दरम्यान घरातील इतर लोकांपासून दूर रहा. विशेष करून वृद्ध, गरोदर महिला, मुले आणि आजारी व्यक्तींपासून दूर रहा.
2 -कोणत्याही स्थितीत संक्रमित व्यक्तीने विवाह आणि इतर सोहळ्यात सहभागी होऊ नये.
3 -संक्रमित व्यक्तीसाठी पाणी पिण्याचा ग्लास, कप, खाण्याची भांडी, टॉवेल इतर वस्तू वेगळ्या ठेवाव्यात घरातील सदस्यांच्या वस्तू वापरू नयेत.
4 -सतत सर्जिकल मास्क घाला आणि प्रत्येक 6-8 तासांनी मास्क बदला. जुना मास्क डिस्पोज करा.
5 -संक्रमित व्यक्तीच्या खोलीची स्वच्छता चांगल्या प्रकारे करावी. प्रत्येक वस्तू डिसइन्फेक्ट करा.
6 -संक्रमित व्यक्तीने घातलेले कपडे साबण आणि पावडरने धुवावेत.
7 -संक्रमित व्यक्तीच्या खोलीची स्वच्छता करताना हँडग्लव्हज घाला. नंतर ते स्वच्छ करा.
8 -संक्रमित व्यक्तीने ठराविक वेळेनंतर सतत साबण आणि सॅनिटायजरने हात स्वच्छ करावेत.
9 -संक्रमित व्यक्तीने किमान 14 दिवसापर्यंत होम आयसोलेशनमध्ये रहावे. लागोपाठ तीन दिवसांपर्यंत ताप न आल्यास होम आयसोलेशनमधून बाहेर येऊ शकता.