पुढील आठवड्यापासून भारतात मिळेल Sputnik V व्हॅक्सीन, जुलैपासून देशातच सुरू होईल उत्पादन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशात जारी कोरोना संकटाच्या दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल, डॉ. बलराम भार्गव, आयसीएमआर आणि नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल उपस्थित होते. लव अग्रवाल यांनी सांगितले की, देशातील 187 जिल्ह्यांमध्ये मागील 2 आठवड्यापासून कोरोना प्रकरणांमध्ये घसरण सुरू आहे.

या दरम्यान आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, पुढील आठवड्यापासून स्पुतनिक व्ही व्हॅक्सीनची विक्री भारतात सुरू होईल. सोबतच स्पुतनिकचे ऑक्टोबरपर्यंत भारतात उत्पादन होईल. भारतात आता रशियन व्हॅक्सीन स्पूतनिक पुढील आठवड्यात बाजारात दिसू लागेल. पुढील 2 महिन्यात अशी योजना आहे की, भारतीय कंपन्यांसह मिळून रशियन कंपनी भारतातच या व्हॅक्सीनचे उत्पादन करेल. 2 बिलियन डोस भारतात पुढील पाच महिन्यात उपलब्ध होतील.

आरोग्य मंत्रालयाच्या संयुक्त सचिवांनी सांगितले की, आता हळुहळु पुन्हा रिकव्हरी रेट वाढत आहे. सध्या रिकव्हरी रेट 83.26% आहे. आता प्रकरणे सुद्धा कमी होत आहेत. टेस्टिंग सुद्धा आता सर्वात जास्त होत आहेत.