आरोग्य मंत्रालय ३४३ औषधांवर बंदी घालणार ?

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन

देशातील सर्वोच्च औषध सल्लागार समितीच्या एका उपसमितीने केलेल्या शिफारशीवरुन आरोग्य मंत्रालय ३४३ औषधांवर बंदी घालण्याचा विचार करत असल्याचे वृत्त समोर आले आहे. ही औषधे फिक्सड डोस कॉम्बिनेशन ( एफडीसी ) आहेत. जर अशी औषधे बंद केलीत तरच देशातील ॲबॉट सारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांसह पीरामल, मॅक्लिऑडस, सिप्ला आणि ल्यूपिन या औषधे तयार करणाऱ्या कंपन्यांवर परिणाम होणार आहे. त्यामुळे कंपन्या सरकारच्या या निर्णयाविरोधात न्यायालयात जाणार आहे अशी शक्यता आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सरकारने जर औषध बंदी करण्याचा निर्णय घेतला तर सर्रास वापरल्या जाणाऱ्या फेंसेडील, सेरिडॉन आणि डी कोल्ड टोटल यांसारखे कफ सिरप आणि वेदनाशामक गोळ्या, तसेच तापावरील औषधांवर बंदी येईल. आरोग्य मंत्रालय ३४३ फिक्स डोस कॉम्बिनेशन असलेल्या औषधांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर बंदी घालण्याच्या विचारात आहे. यासाठी ड्रग टेक्नॉलजी ॲडव्हायजरी बोर्ड (डीटीएबी) शिफारशीनुसार औषधांची यादी तयार करण्यात आली आहे.
[amazon_link asins=’B002U1ZBG0′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’83e85ce8-97b8-11e8-90d9-63a0b201cd14′]

दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने डीटीएबीला कोणत्या औषधांवर बंदी घातली पाहिजे याबाबत आरोग्य मंत्रालयाला सल्ला देण्यास सांगितले होते. या आदेशानुसार डीटीएबीने शिफारस केली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून औषधांच्या बंदीबाबत अंतिम अधिसूचना पुढच्या आठवड्यात जारी केली जाण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत तज्ज्ञांचा विचार घेऊन चर्चा केल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सुत्रांद्वारे मिळाली आहे.
[amazon_link asins=’B07FNT85T6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’45c9cdff-97b8-11e8-bcbe-4b7163c90ed5′]

विशेष म्हणजे फिक्सड डोस कॉम्बिनेशन आजारांवरील उपचारांसाठी वापरली जाणारी दोन किंवा त्यापेक्षा अधिक पदार्थांपासून बनलेल्या औषधांना फिक्सड डोस कॉम्बिनेशन म्हटले जाते. यामध्ये पॅरासिटेमल+फेनिलेफ्राईन+कॅफिन आणि पॅरासिटेमल+प्रॉपिफेनाजोन+कॅफिन या कॉम्बिनेशन औषधांचाही समावेश आहे.

तसेच फिक्सड्‌ डोस कॉम्बिनेशन (एफडीसी) असलेल्या औषधांवर बंदी घातल्यास देशातील एकूण औषध बाजारापैकी २ टक्के बाजारावर परिणाम होणार आहे. देशात औषध बाजारात सध्या १ लाख कोटी रुपयांची उलाढाल होते. त्यापैकी एफडीसीची औषधे २ हजार कोटींची आहेत. तरी गेल्या दोन वर्षांत या औषधांच्या विक्रीमध्ये १ हजार कोटींची घट झाली आहे. २०१६ मध्ये ३ हजार कोटींवरुन २०१७ मध्ये २ हजार १८३ कोटी रुपयांची एफडीसीच्या औषधांची विक्री झाली होती.