Dangerous Diseases : कोविड-19 पेक्षा सुद्धा जास्त घातक होऊ शकतात ‘हे’ 7 आजार, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – 2020 च्या सुरुवातीला कोविड-19 महामारी वेगाने जगभरात पसरली आणि लाखो लोकांचा बळी घेतला. कोरोना व्हायरसच्या या प्रकोपाने जगातील प्रत्येक माणसाला घाबरवले होते. आता कोरोनाची व्हॅक्सीन आल्याने लोकांच्या मनातील भिती हळुहळु कमी होऊ शकते. जगात अजूनही किमान 7 असे आजार आहेत, जे कोरोनापेक्षा जास्त घातक ठरू शकतात. ते आजार कोणते ते जाणून घेवूयात –

इबोला
इबोलाचा अलिकडील प्रकोप सर्वात घातक मानला गेला होता. मात्र, यापेक्षा वाईट प्रकोप येऊ नये, या भितीने सुद्धा लोक घाबरलेले आहेत. आजही या आजाराची स्थिती ठिक नाही. आकड्यांनुसार, 3400 पेक्षा जास्त प्रकरणे आणि 2270 मृत्यू झाले आहेत. इबोलाच्या व्हॅक्सीनला जानेवारी 2020मध्ये अनुमोदन देण्यात आले होते, परंतु अजून याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. योग्यवेळी पावले उचलली नाहीत तर इबोला महमारीमध्ये बदलू शकतो, ज्याचे परिणाम अतिशय भितीदायक असू शकतात.

लासा ताप
लासा ताप एक व्हायरल संसर्ग आहे, जो रक्तस्त्राव होणार्‍या आजाराच्या लक्षणांचे कारण बनतो. याबाबत सर्वात धोकादायक हे आहे की, प्रत्येक 5 पैकी 1 लासा तापाने संक्रमित व्यक्तीच्या लिव्हर, स्पलीन आणि मूत्रपिंडात जीवघेणा धोका निर्माण होतो. हा सुद्धा सहज पसरतो. कारण दुषीत घरगुती वस्तू, मूत्र, मल, रक्ताच्या माध्यमातून पसरतो. अफ्रीकेत या आजाराने हजारो लोकांचा जीव घेतला आहे. यावर अजूनही व्हॅक्सीन उपलब्ध नाही.

मारबर्ग व्हायरस आजार
इबोला ज्यामुळे होतो त्या व्हायरसच्या कुटुंबाशी संबंधित मारबर्ग व्हायरस, अतिशय संसर्गजन्य होऊ शकतो. जो मृत किंवा जिवंत रूग्णाला स्पर्श केल्याने सुद्धा पसरू शकतो. या भयंकर आजाराची जोखिम 88% आहे, याच्या शेवटच्या प्रकोपात तिनही संक्रमित व्यक्तींचा मृत्यू झाला होता.

एमईआरएस – कोव्ह
मध्य पूर्व श्वसन सिंड्रोम (एमईआरएस), एक संसर्गजन्य आजार आहे, जो प्रामुख्याने श्वसन कणांच्या माध्यमातून पसरतो. हा आजार कधीही आणि काही वेळातच भयंकर आजाराचे रूप घेऊ शकतो. 2002 मध्ये चीनमध्ये याचा प्रथम प्रकोप झाला होता.

नीपाह व्हायरस
निप्पा वायरस, एक असा संसर्ग आहे जो खसरा व्हायरसशी संबंधित आहे. 2018 मध्ये निपाह व्हायरस केरळात मोठ्याप्रमाणात पसरला होता. हा आजार पुन्हा पसरू शकतो. वटवाघुळाकडून मनुष्यात पसरणार्‍या या संसर्गाच्या लक्षणात – नर्व्हस इम्फ्लेशन, सीझन, भयंकर डोकेदुखी, उलटी, बेशुद्ध पडणे, मळमळणे यांचा समावेश होतो.

डिसीज-एक्स
डिसीज-एक्सच्या शोधाने जगाला चिंतेत टाकले आहे. तज्ज्ञांनुसार 2021 हा संभाव्य महामारीचे रूप घेऊ शकतो. 1976मध्ये इबोलाचा शोध लावणारे शास्त्रज्ञ जीन-जाक मुएंबे टॅमफम यांनी इशारा दिला आहे की, आता डिसीज एक्स कोरोनापेक्षा धोकादायक आणि वेगाने महामारीप्रमाणे पसरू शकतो.

अज्ञात आजारांबाबत इशारा देताना प्रो. टॅमफम यांनी म्हटले की, अफ्रीकेच्या उष्णकटिबंधीय जंगलातून येणारे नवे व्हायरस वेगाने पसरू शकतात आणि मानवासाठी धोकादायक ठरू शकतात. आपण आता अशा जगात राहात आहोत जिथे रोगकारक निघू शकतात, जे मानवासाठी मोठा धोका आहेत.