Heeramandi Web Series | संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हीरामंडी वेबसिरीज लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस; पाकिस्तानातील रेड लाईट एरियाचे दाखवणार वास्तव

पोलीसनामा ऑनलाइन – Heeramandi Web Series | दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांची ‘हीरामंडी’ (Heeramandi) ही बहुचर्चित वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांची कलाकृती ही कायम प्रेक्षकांच्या मनात घर करून राहते. प्रत्येक कलाकृतीमधील त्यांचे बारकावे आणि त्यांच्या चित्रपटांतील भव्यता ही कायम दर्जेदार असते. पाकिस्तानातील रेड लाईट एरियाचे वास्तव दाखवणारी ही हीरामंडी वेबसिरीज (Heeramandi Web Series) असणार आहे. या सीरिजच्या पहिल्या सीझनचे शूटिंग या महिन्याच्या अखेरपर्यंत संपेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

याआधी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी मुंबईतील रेड लाईट एरियामधील भयान वास्तव दाखवणारा गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. यामधील आलिया भट्टच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. आता लवकरच संजय लीला भन्साळी हे पाकिस्तानातील रेड लाईट एरिया (Red Light Area In Pakistan) असलेला ‘हीरामंडी’ येथील कथा वेबसिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडणार आहे. या सीरिजच्या पहिल्या सीझनमध्ये आठ भाग असणार आहेत. बहुचर्चित वेबसीरिजचा दुसरा सीझन लगेचच 2024 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी निर्मात्यांनी या सीरिजचं पोस्टर आणि टीझर शेअर केला होता. पोस्टर रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांना या सीरिजची उत्सुकता लागली आहे. मागील काही महिन्यांपासून या सीरिजचं शूटिंग सुरू असून यावर्षाच्या शेवटी ही मल्टी स्टार सीरिज प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

या सिरीजच्या माध्यामातून दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT Platform) पदार्पण करत आहे. या वेबसिरीज कडून प्रेक्षकांच्या फार अपेक्षा आहे. या सिरीजची कास्टिंगही तगडी असून बॉलिवूडचे अनेक लोकप्रिय चेहरे यामध्ये झळकणार आहेत. ‘हीरामंडी’ सिरीजमध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha), अदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari), ऋचा चड्ढा (Richa Chadha), फरीदा जलाल (Farida Jalal), मनीषा कोइराला (Manisha Koirala), संजीदा शेख (Sanjeeda Shaikh), फरदीन खान (Fardeen Khan) आणि अध्ययन सुमन (Adhyayan Suman) हे कलाकार मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.

‘हीरामंडी’ (Heeramandi web Series) या सीरिजमध्ये पाकिस्तानातील रेड लाइट एरियाची गोष्ट दाखवण्यात आली आहे.
‘हीरामंडी’ला ‘शाही मोहल्ला’देखील म्हटलं जातं.
(Shahi Mohalla) भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली नव्हती त्यावेळी अफगाणिस्तान (Afghanistan)
आणि उझबेकिस्तानातील (Uzbekistan) स्त्रिया ‘हीरामंडी’मध्ये स्थायिक झाल्या होत्या.
‘हीरामंडी’ या सीरिजमध्ये राजकारण, प्रेम आणि फसवणूक अशा अनेक गोष्टी समाविष्ट असणार आहेत.
हिरामंडीची ही कथा भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर आधारित आहे.
गेल्या 14 वर्षांपासून संजय लीला भन्साळी या सीरिजवर काम करत आहेत.
त्यामुळे ही एक भव्य दिव्य अशी कलाकृती असणार आहे.

Web Title :   Heeramandi Web Series | heeramandi sanjay leela bhansali heeramandi web series know starcast release date

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap News | 1 लाखाची लाच घेताना वरिष्ठ लिपिक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

G-20 Digital Economy Working Group | जी-20 डिजिटल अर्थव्यवस्था कार्यगटाची तिसरी बैठक ! भारताच्या डिजिटल सामर्थ्याचे दर्शन घडविणाऱ्या प्रदर्शनाचे उद्घाटन

The Clothing Manufacturers Association of India (CMAI) | G-20 अंतर्गत सिव्हिल 20 इंडिया 2023 परिषदेत धोरण निर्मितीसाठी ‘भारतीय : एक शाश्वत परंपरा’ उपक्रमाचे आयोजन