The Clothing Manufacturers Association of India (CMAI) | G-20 अंतर्गत सिव्हिल 20 इंडिया 2023 परिषदेत धोरण निर्मितीसाठी ‘भारतीय : एक शाश्वत परंपरा’ उपक्रमाचे आयोजन

फॅशन उद्योगातील शाश्वततेसाठी सीएमएआय आणि सॉफ्टचा प्रचार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – क्लोदिंग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया (सीएमएआय) The Clothing Manufacturers Association of India (CMAI) आणि एमकेएसएसएस स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (SOFT) यांनी संयुक्त विद्यमाने आठ आणि नऊ जून रोजी ‘भारतीय : अ लिगसी ऑफ सस्टेनेबिलिटी’ या विषयावरील दोन दिवसीय परिषदेचे पुणे येथे आयोजन केले होते. जी-२० अंतर्गत सिव्हिल २० इंडिया २०२३ च्या (Civil20 India 2023) कार्यकारी गटाला (वर्किंग ग्रुप) पर्यावरणपूरक जीवनशैलीला प्रोत्साहन देणाऱ्या (Lifestyle for Environment)धोरण निर्मितीमध्ये योगदान देण्याच्या उद्देशाने फॅशन उद्योगातील शाश्वतता यावर या परिषदेत विचारमंथन करण्यात आले. The Clothing Manufacturers Association of India (CMAI)

‘ग्रीन फॅशन इंडिया’ प्लॅटफॉर्मचा एक भाग म्हणून ही परिषद आयोजित करण्यात आली होती. जी-२० उपक्रमांतर्गत सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी सिव्हिल-२० इंडिया २०२३ चा लाइफ हा कार्यकारी गट कार्यरत आहे. फॅशन उद्योगाला शाश्वत पद्धती स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी अधिकृत समन्वयक म्हणून योजक (YOJAK)सेंटर फॉर रिसर्च अँड स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट इंडिया (LiFE) कार्यरत आहे. तिचा हा प्लॅटफॉर्म आहे. ‘ग्रीन इंडिया फॅशन’ प्लॅटफॉर्म शाश्वत फॅशन क्षेत्रातील उद्योग व शिक्षण या दोन्ही विभागात संशोधन आणि प्रोत्साहन पुढाकारांना सक्रिय पाठिंबा देत आहे. भारत, जर्मनी आणि ब्रिटनमधील (युनायटेड किंगडम) फॅशन उद्योगातील शाश्वत पद्धतींचा व्यापक अनुभव असलेल्या ५५ हून अधिक मान्यवरांनी या दोन दिवसीय परिषदेत भाग घेतला. धोरण निर्मितीसाठी शिफारशी करण्याकरिता या मान्यवरांनी विविध सत्रांमध्ये महत्त्वपूर्ण विचारमंथन केले. The Clothing Manufacturers Association of India (CMAI)

क्लोदिंग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे (CMAI) अध्यक्ष राजेश मसंद (Rajesh Masand) म्हणाले, “पर्यावरण आणि आपल्या भावी पिढ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या या जागतिक सहयोगी चळवळीत एक महत्त्वाचा घटक म्हणून सहभागी होण्याची संधी मिळणे हा आमचा सन्मान आहे. भारतातील वस्त्रप्रावरणे उद्योगाची एक प्रतिनिधी संघटना म्हणून आम्ही चार हजारपेक्षा जास्त सदस्यांपर्यंत याचा प्रचार करण्याचा प्रयत्न करत आहोत. यात मोठ्या प्रमाणात उत्पादक आणि ब्रँड यांचा समावेश असून, त्यासह २० हजारांहून अधिक किरकोळ विक्रेते यांच्यापर्यंतही पोहोचण्याचा आमचा उद्देश आहे.”

या परिषदेचे प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय वस्त्र उत्पादक संघटनेचे मुख्य मार्गदर्शक आणि एमकेएसएसएस स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या (सॉफ्ट) सल्लागार मंडळ समितीचे अध्यक्ष राहुल मेहता उपस्थित होते. ते म्हणाले, “फॅशन उद्योग हळूहळू शाश्वततेचे महत्त्व ओळखत असून, त्या दिशेने पावले उचलत आहे. पोशाख निर्माते, उत्पादकांमध्ये अजूनही याबाबत आवश्यक माहिती, ज्ञान यांचा अभाव आहे. तसेच अद्याप शाश्वत उत्पादनांसाठी ग्राहकांची मागणी अल्प आहे. याव्यतिरिक्त, अशी उत्पादने विकसित करण्यासाठी येणारा खर्च एक महत्त्वपूर्ण अडथळा ठरत आहे. ही परिषद नवनव्या कल्पनांची, पद्धतींची देवाणघेवाण करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ आहे. जागरुकता वाढवणे आणि शाश्वततेला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या परिसंस्थेला चालना देणे हा याचा उद्देश आहे.”

परिषदेतील विशेष पाहुणे, आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेडचे मुख्य शाश्वत अधिकारी नरेश त्यागी यांनीही याला दुजोरा दिला. ते म्हणाले, “ अमर्याद उपभोग आणि अतिउत्पादनामुळे भारतीयांच्या पारंपरिक शाश्वत जीवनशैलीच्या पद्धती लुप्त झाल्या आहेत. असे असूनही, आजची जेन-झी ग्राहक पिढी, गुंतवणूकदार आणि नियामक संस्था यांच्यामुळे शाश्वत फॅशनबाबत वाढलेला कल लक्षणीय आहे. तरीही, या आघाडीवर जागरुकता वाढवण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर, सरकारने विविध उद्योगांमध्ये शाश्वततेला चालना देण्यासाठी उचललेली पावले प्रोत्साहन देणारी आहेत. भारतातील शाश्वत फॅशनला चालना देण्यासाठी सरकारची ही पावले महत्त्वाची भूमिका बजावतील.

परिषदेतील प्रमुख वक्ते, रिलायन्स रिटेलच्या संशोधन आणि विकास विभागाचे सल्लागार, मनोहर सॅम्युअल म्हणाले, “शाश्वत फॅशनबद्दल चर्चा सुरू असली तरी, ग्राहकांच्या खरेदीच्या वर्तनातील वास्तववादी बदल पूर्ण होणे बाकी आहे. शाश्वततेतील उत्कृष्टतेची उदाहरणे आहेत, मात्र ती अद्याप व्यापक चळवळीत बदललेली नाहीत. हे परिवर्तन तेव्हाच घडू शकते जेव्हा ग्राहकांशी मजबूत बंध निर्माण केला जाईल. सध्या, बरेच विक्रेते “ऑर्गेनिक” आणि “शाश्वत” हे शब्द अगदी सरसकट वापरतात. त्यामुळे ग्राहकांमध्ये गोंधळ होतो. एक उद्योग म्हणून, शाश्वततेत नेमका कशाचा समावेश होतो, हे परिभाषित करण्याची आणि ग्राहकांपर्यंत प्रभावीपणे त्याचा नेमकेपणा पोहोचवण्याची गरज आहे.”

या परिषदेचे महत्त्व सांगताना सीएमएआय आणि सॉफ्टच्या समन्वय समितीचे अध्यक्ष निखिल फुरिया म्हणाले, “ या परिषदेत झालेल्या चर्चेची परिणीती दहा कलमांच्या शिफारशींच्या प्रस्तावात झाली आहे. जी-२० आणि सी-२० लाइफ कार्यकारी गटांच्या समित्यांमधील धोरणात्मक संवादाचा आधार म्हणून हा प्रस्ताव काम करेल.

(Organizer of this conference) या परिषदेचे संयोजक, एमकेएसएसएस स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीचे (सॉफ्ट), प्राचार्य डॉ. एम. एम. हुंडेकर म्हणाले, “तीन हजार वर्षांहून अधिक काळाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेल्या भारतीय संस्कृतीमध्ये शाश्वतता दीर्घकाळापासून रुजलेली आहे. परिणामी, जागतिक स्तरावर शाश्वत फॅशन रुजवण्यात भारत आघाडीवर आहे. तथापि, भारतातील असंघटित कपडे उत्पादन क्षेत्रातील शाश्वत पद्धतींबाबत जागरूकतेचा अभाव दूर करणे महत्त्वाचे आहे. स्वस्त उत्पादनांच्या मागे लागल्यामुळे शाश्वत पद्धतींकडे दुर्लक्ष होत आहे. त्याच बरोबर, ग्राहकांना माहितीपूर्ण खरेदी निर्णय घेण्याबाबत आणि शाश्वत उत्पादनांना प्राधान्य देण्याबाबत जागरुक तसेच शिक्षित करण्याची गरज आहे. जागरूकता वाढवून आणि शाश्वत पर्यायांना प्रोत्साहन देऊन, भारत शाश्वत फॅशन उद्योगाला चालना देऊन आपल्या पारंपरिक पद्धतींवर पुन्हा हक्क मिळवू शकतो आणि त्यांचे पुनरुज्जीवन करू शकतो.”

या परिषदेदरम्यान करण्यात आलेल्या प्रमुख शिफारशी पुढीलप्रमाणे आहेत :

वस्त्रोद्योग आणि फॅशन उद्योगातील बड्या उद्योजकांना त्यांचा सामाजिक जबाबदारी निधी (सीएसआर) शाश्वततेसाठी आणि इतर विकासात्मक प्रकल्पांसाठी शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने वापरावा, अशा विनंती केली जाईल. वरील सूचनेनुसार किमान काही टक्के निधी अनिवार्यपणे वापरण्याचा आदेश दिला जाईल. यामुळे केवळ शैक्षणिक आणि उद्योग सहकार्य वाढणार नाही, तर कॉर्पोरेट्स आणि उद्योगांमध्ये आत्म-जागरूकता आणि गांभीर्यदेखील निर्माण होईल. ज्यामुळे सीएसआरचा अर्थपूर्ण उद्देश साध्य होईल.

परदेशातून आयात केलेली नैसर्गिक संसाधने वापरण्यासाठीचे विशेष धोरण आवश्यक आहे.
अशाबाबतीत पृथ्वीच्या फायद्यासाठी प्रादेशिक पातळीवरील नैसर्गिक स्रोतांचे संरक्षण करणे अत्यावश्यक आहे. (कापसाचे बियाणे, रेशीम टसर यार्न आयात केले जातात. त्याचा स्थानिक स्रोतांवर प्रतिकूल परिणाम होतो. स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेले नैसर्गिक स्रोत नष्ट होत आहेत. त्यांचे अस्तित्व लुप्त होत आहे.)

फॅशन उद्योगाच्या मूल्य साखळीमधील मागोवा घेण्याची क्षमता आणि पारदर्शकता धोरणांमध्ये अनिवार्य असणे महत्त्वाचे आहे.

ग्राहकांच्या आरोग्य संरक्षणाची पुष्टी करणार्‍या पैलूंबद्दल माहिती देणारी अचूक लेबल प्रणाली अनिवार्य केली जाईल.

कारागिरांना बौद्धिक वारसा जपण्यासाठी मोबाईल इनोव्हेशन आणि सुविधा केंद्रांद्वारे पाठबळ दिले जाईल.
शिल्पांच्या उत्पादनातील मूल्य साखळी प्रणालीमुळे पृथ्वी आणि मानवी प्रणालींचे नुकसान होत असल्याचे दिसून
आले आहे. कारण कारागीर खेड्यात वसलेले आहेत, ते तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाबाबत अनुकूल नसतात.
तथापि, प्रगत मोबाइल प्रणाली कारागिरांच्या घरापर्यंत पोहोचली, तर हस्तकला टिकून राहण्यासाठी,
समृद्ध होण्यासाठी मदत मिळेल.

नैसर्गिक किंवा हस्तकलेसाठी आणि मानवनिर्मित, मशीननिर्मित उत्पादनांसाठी स्वतंत्रपणे विचार केला जाईल.
या दोन श्रेणींसाठी मानांकन पद्धती आणि नियम वेगळे असतील.
पुढे, स्टार रेटिंग वापरून कार्बन फूटप्रिंट तसेच सामाजिक शाश्वततेच्या आधारे रेटिंग प्रणालीचा विचार केला जाईल.
पहिल्या श्रेणीत शाश्वत कापडासाठी भारतीय मानक म्हणून नाव दिले जाऊ शकते.
दर्जा, गुणवत्ता कायम राखणाऱ्या वस्तूंना सीएसआर आणि सरकारी साइट्सवरील आर्थिक लाभांसाठी प्राधान्य दिले जाईल.

सामग्री, प्रक्रिया आणि परिणामांच्या अशा संदर्भात पारंपरिक हस्तकलेचे मूल्यांकन करण्यावर ही धोरणे केंद्रीभूत असतील.

हस्तकलेचे शाश्वत पैलू सांगणारी वाहने ग्राहकांना सुज्ञ आणि जाणीवपूर्वक निवडीसाठी उपलब्ध केली जातील.
“क्राफ्ट्स ऑन व्हील्स” सारख्या मोबाईल विक्री प्लॅटफॉर्मद्वारे हस्तकला कारागिरांच्या नव्या पिढ्यांना
गुंतवून ठेवण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. त्यासाठी त्यांना आर्थिक लाभ,
ओळख आणि वाढीसाठी मदतीची उपलब्धताही असेल.

ग्राहक जागृतीसाठी प्रमुख फॅशन बिझनेस सेंटर्सना प्रमुख ठिकाणी शाश्वत उत्पादने प्रदर्शित करणे अनिवार्य केले जाईल.

फॅशन ऑर्गनायझेशन ज्या सामाजिक आणि पर्यावरण संरक्षणासह सर्वसमावेशक वाढीस प्रोत्साहन देतात,
त्यांना कर लाभ आणि अनुदानासह विशेष प्रमाणपत्रे सुरू केली जातील.

संशोधन, नवोपक्रम, व्यावसायिक शिक्षण, सहयोग, मोठे-लहान प्रकल्प, वाढते सहकार्य आणि फॅशन व्यवसाया
अंतर्गत आणि बाह्य नेटवर्किंग निर्माण करण्यासाठी नेदरलँड्सच्या वॅजेनिंगेन युनिव्हर्सिटी आणि रिसर्चच्या
सहकार्याने “सर्कुलर फॅशन लॅब्स” सादर करण्यासाठी विशेष सुविधा केंद्रे सुरू करण्याचीही शिफारस करण्यात
आली आहे.

या परिषदेदरम्यान झालेल्या चर्चेमध्ये वर्तुळाकार फॅशन, भारतातील शाश्वत मानवी प्रणाली,
भारतीय फॅशन, सध्याच्या फॅशन व्यवसायातील सर्वसमावेशक वाढ विरुद्ध संरक्षण आव्हाने आणि हातमाग, हस्तकला,
भरतकाम आदी पारंपारिक वारशाचे संरक्षण या विषयांचा समावेश आहे.
तसेच अन्य विषयांसह पुनरुत्पादनाच्या दृष्टीकोनातून शाश्वततेवर होणारा प्रभाव याचाही समावेश आहे.

या परिषदेत,लाइफचे भारतातील समन्वयक आणि योजक सेंटर फॉर रिसर्च अँड स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग फॉर सस्टेनेबल
डेव्हलपमेंटचे अध्यक्ष डॉ. गजानन डांगे, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रवींद्र देव आणि ग्रीन फॅशन इंडियाच्या
अध्यक्षा आर्किटेक्ट मोहना कदम यांच्यासह या उद्योगातील तज्ज्ञ , शिक्षणतज्ज्ञ, एनजीओ अधिकारी,
ब्रँड मालक आणि फॅशन उद्योजक सहभागी झाले होते. शाश्वततेला केंद्रस्थानी ठेवून कृती आराखडा तयार
करण्यासाठी त्यांनी मोलाची भूमिका बजावली.

Web Title :   The Clothing Manufacturers Association of India (CMAI) | Organized ‘India: A Sustainable Tradition’ initiative for policy making at Civil 20 India 2023 Summit under G-20

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MNS MLA Raju Patil | ‘ही तर भाजप शिंदे गटाची खेळी’, कल्याण लोकसभा जागेच्या वादावरुन मनसेने काढला चिमटा; म्हणाले – ‘ही मंडळी पुन्हा…’

Maharashtra Politics News | वसुलीबाज कृषीमंत्र्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा; काँग्रेसची मागणी

Hruta Durgule | अभिनेत्री ऋता दुर्गुळे पडली होती सहकलाकाराच्या प्रेमात; मुलाखतीमध्ये केले कबुल