हेलिकॉप्टर सेवा विस्तारणार; नोएडापासून 2 एअरपोर्ट आणि 36 शहरांमध्ये उड्डाण करणार ‘Bell-MI’

नोएडा : हेलिकॉप्टर सेवा आता विस्तारणार आहे. सेक्टर 151A मध्ये हेलिपोर्ट तयार केला जात आहे. त्याशिवाय त्यासोबतच 90 एकरमध्ये गोल्फ कोर्सचे मैदानही तयार केले जात आहे. ही सेवा सुरु करण्यासाठी नोएडापासून 300-400 किमीच्या क्षेत्रात येणाऱ्या क्षेत्रांसाठी लाभ मिळणार आहे.

जर हेलिपोर्टचे काम याच वेगाने चालत राहिले तर नोएडा ऍथोरिटी याचवर्षी 2021 पासून देशातील दोन मोठ्या एअरपोर्ट आणि सुमारे 36 शहरांच्या हेलिकॉप्टर सर्व्हिस सुरु करेल. Bell 412 आणि MI 172 डिजाईनसाठी हेलिकॉप्टर नोएडा येथून उड्डाण करणार आहे. ही सर्व शहरे पर्यटन आणि धार्मिकदृष्टीने महत्त्वाची आहेत. त्यासाठी जवळपास 10 एकर जमिनीचे पूर्ण काम झाले आहे. तसेच गौतमबुद्ध नगर येथे अनेक मोठे प्रकल्प सुरु होत आहे.

परी चौकापासून हेलिपोर्टचे अंतर 12 किमी आणि महामाया फ्लायओव्हरपासून 20 किमीचे होईल. Bell 412 आणि MI 172 च्या डिजाईनसाठी 10 हेलिकॉप्टरसह ही सेवा सुरु केली जात आहे. या हेलिकॉप्टरमध्ये 10 लोक बसू शकतात.

‘या’ ठिकाणांसाठी थेट उड्डाण करेल हेलिकॉप्टर

नोएडा ऍथोरिटीने दिलेल्या माहितीनुसार, IGI एअरपोर्ट आणि जेवरमध्ये तयार होणाऱ्या नव्या विमानतळासाठी हेलिकॉप्टर उड्डाण करेल. याशिवाय हे हेलिकॉप्टर मथुरा-आग्रा या ठिकाणांसाठीही पर्यटकांना सेवा देईल. तसेच मोठं-मोठ्या मल्टिनॅशनल कंपन्या असल्याने गुरुग्राम आणि फरीदाबाद या ठिकाणांचाही विचार होऊ शकतो.

चंदीगड, श्रीनगर, नैनीतालसाठी होईल सेवा सुरु

याशिवाय 200 ते 300 किमीच्या अंतरात येणाऱ्या मसूरी, यमुनोत्री, पंतनगर, नैनीताल, उत्तरकाशी, सहस्त्रधारा, श्रीनगर, गौचर, अल्मोडा, नवीन टिहरी, शिमला, बद्दी, हरिद्वार, जयपूर, चंदीगड आणि औलीसाठी ही हेलिकॉप्टर सेवा सुरु होण्याची शक्यता आहे.