Dry ginger Milk Benefits : दूधात मिसळून प्या ‘ही’ पावडर, नंतर पहा कमाल, येथे जाणून घ्या सेवनाचा Best time

नवी दिल्ली : जर तुम्ही आरोग्याबाबत सजग असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सुंठ आणि दूध या वस्तूंचे एकत्रित सेवन केल्यास शरीराला अतिशय फायदा होतो. अनेक प्रकारच्या आजारापासून सुटका होते. सुंठ दुधात अनेक आरोग्य समस्या दूर करण्यास मदत करते. विशेष करून हिवाळ्यात याचे सेवन लाभदायक ठरते.

सुंठ दूध बनवण्याची पद्धत
सुंठ दुध बनवण्यासाठी प्रथम दूध गरम करा. यानंतर दुधात सुंठ पावडर टाका. नंतर दोन्ही उकळवून गाळून घ्या. गाळून कोमट करून प्या. याचे सेवन अ‍ॅसिडिटीत दिलासा देते. बद्धकोष्ठता, पोटदुखीत आराम मिळतो.

सुंठ दुधाचे फायदे

घशात खवखव
घशाच्या खवखव होत असेल तर सुंठ दूध प्यावे. लागोपाठ दोन-तीन दिवस हे दुध सेवन केल्याने खवखव बंद होते. गशाचे इन्फेक्शन दूर होते.

पचनशक्ती वाढते
सुंठ दूध प्यायल्याने पचनशक्ती मजबूत होते. जेवणानंतर पोट फुगत असेल तर हे दुध चांगला पर्याय आहे.

उचकीसाठी लाभदायक
सतत उचकी लागत असेल तर सुंठ दुध सेवन करा. आराम मिळेल. सुंठ दुध कोमट करून प्या.

लैंगिक समस्या
सुंठ दूध प्यायल्याने लैंगिक जीवन चांगले होते. एक्सपर्ट सांगातात हे दुध पुरूषांच्या लैंगिक समस्या दूर करते.

सुंठ दूध पिण्याची योग्य वेळ
हेल्थ एक्सपर्ट सांगतात, झोपण्यापूर्वी सुंठ दुध पिणे लाभदायक आहे.