‘तो’ फोटो मिळाल्यानं ‘ड्रीमगर्ल’चा आनंद गगनात मावेना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ड्रीम गर्ल हेमा मालिनी (hema-malini) यांनी 1968 साली प्रदर्शित झालेल्या ‘सपनों के सौदागर’ या चित्रपटातून आपल्या फिल्मी करीअरला सुरुवात केली होती. सिनेमात हेमा दुप्पट वयाच्या राज कपूर यांच्यासोबत काम करण्यास तयार झाल्या ख-या. पण हा सिनेमा फार काही कमाल दाखवू शकला नाही.

या डेब्यू सिनेमाआधी हेमांनी एका तामिळ मॅगझिनसाठी खास फोटोशूट केले होते. आज या गोष्टीला जवळपास 55 वर्षे होत आहेत. या फोटोशूटचा फोटो (photoshoot-debut) हेमा गेल्या कित्येक वर्षांपासून त्या शोधत होत्या. आपल्या बायोग्राफीत हा फोटो त्यांना प्रकाशित करायचा होता. मात्र अनेक प्रयत्न करूनही त्यांना हा फोटो मिळाला नव्हता. मात्र शनिवारी हा फोटो त्यांना मिळाला आणि त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. मग काय, हा फोटो त्यांनी चाहत्यांसोबत शेअर केला. सोबत एक भलीमोठी पोस्टही.

पोस्टमध्ये हेमा मालिनी यांनी लिहले आहे की, मी गेल्या अनेक वर्षांपासून हा फोटो शोधत होते. तामिळ मॅगझिनसाठी मी एक खास फोटोशूट केले होते. मॅगझिनचे नाव मला आता आठवत नाही. पण एव्हीएम स्टुडिओमध्ये याचे शूटींग झाले होते. राज कपूर यांच्यासोबत सपनों का सौदागर मधून डेब्यू करण्यापूर्वी. त्यावेळी मी 14, 15 वर्षाची असेन. हा फोटो माझ्या ‘बियॉन्ड द ड्रिमगर्ल’ या बायोग्राफी असावा, अशी माझी इच्छा होती. मात्र दुर्दैवाने त्यावेळी हा फोटो मिळाला नाही. पण अखेर आज हा फोटो मला मिळाला. मी खूप आनंदी असून आता हा फोटो मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. हेमा यांनी आपल्या 4 दशकांच्या करिअरमध्ये 150 पेक्षा अधिक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. 1961 साल त्यांनी सर्वप्रथम ‘तांडव वनवासम’मध्ये एक छोटीशी भूमिका साकारली होती.