रक्तदानाच्या निमित्ताने राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन : हेमंत बागुल

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   “अंतरराष्ट्रीय मानवता दिवसाचे “निमित्त साधून महाराष्ट्राच्या रक्ताचा तुटवडा लक्ष्यात घेता “आधार सेवा केंद्र ” व” पुणे ब्लड बँक” यांच्या संयुक्त विद्यमानाने आज भव्य रक्तदान शिबिराचे शिवदर्शन बागांमध्ये आयोजित करण्यात आले होते .

या शिबिरास शिवदर्शन,सहकारनगर ,पद्मावती,पर्वती दर्शन ,तावरे कॉलनी आदी भागातून नागरिकांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला . महाराष्ट्र शासनाच्या आव्हानाला साद देऊन सुमारे ११३ हून अधिक नागरिकांनी रक्तदान केले .

या शिबिराचे उद्घाटन पुणे शहराचे माजी उपमहापौर व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे गटनेते मा. श्री आबा बागुल यांच्या हस्ते करण्यात आले . याप्रसंगी नंदकुमार बानगुडे ,घनश्याम सावंत ,नंदकुमार कोंढाळकर ,रमेश भंडारी ,राजेंद्र बागुल , कपिल बागुल, राहुल जाधव , गोरख मरळ , सागर बागुल ,सतीश पवार, महेश ढवळे ,योगेश निकाळजे, कुमार खटावकर, आकाश खटावकर, विशाल लोणारे, अशोक शिंदे ,लक्ष्मण जन्नु, किरण वरपे , निखिल सोनवणे ,सुयोग धाडवे व आदर्श सेवा केंद्राचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते .

या प्रसंगी आधार सेवा केंद्राचे संस्थापक अध्यक्ष मा.हेमंत आबा बागुल यांनी मनोगत व्यक्त केला .ते म्हणाले सर्व जाती धर्मातील नागरिकांनी रक्त दान करून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवून आणले. त्यांनी रक्तदात्यांचे व पुणे ब्लड बँकेचे यांचे विशेष आभार मानले.