High Blood Pressure | ‘या’ 7 लक्षणांमुळं ब्लड प्रेशर खुप हाय असल्याचं समजतं, एक्सपर्टने दिला इशारा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – हाय ब्लड प्रेशर (High Blood Pressure) म्हणजे हायपरटेन्शनचा आजार मनुष्याला मृत्यूकडे ढकलू शकतो. याचा संबंध आर्टिरियल्स नावाच्या धमण्यांशी आहे. या धमण्या शरीरात ब्लड फ्लो रेग्युलेट करण्याचे काम करतात. जेव्हा त्या पातळ होतात तेव्हा मनुष्याच्या हृदयाला रक्त पम्प करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते आणि येथूनच ब्लड प्रेशरची (High Blood Pressure) समस्या सुरू होते.

डॉक्टर म्हणतात जर या रक्त धमण्यांचा उपचार केला नाही तर हार्ट अटॅक आणि स्ट्रोकसारखे गंभीर कॉम्प्लिकेशन दिसून येतात. ब्लड प्रेशरचा आजार जास्त घातक यासाठी असतो कारण याची लक्षणे सहजपणे दिसत नाहीत. वेलिंग्टन हॉस्पिटलचे कन्सल्टंट कार्डियोलॉजिस्ट डॉक्टर अफजल सोहेब म्हणतात, हाय ब्लड प्रेशरचा वाढता आजार 6 संकेतावरून ओळखता येऊ शकतो. हायपरटेन्शनच्या प्रामुख्याने दोन अर्जंट आणि इमर्जन्सी कॅटेगरी आहेत.

– अर्जंट हायपरटेन्शन –

ब्लड प्रेशर हाय होते पण यामध्ये कोणत्याही अवयवाचे नुकसान होण्याची शक्यता नसते.

– इमर्जन्सी हायपरटेन्शन –

इमर्जन्सी हायपरटेन्शनमध्ये रूग्णाचे ब्लड प्रेशर हाय होण्यासह अवयवांचे सुद्धा नुकसान होते. हे मनुष्याचा जीव धोक्यात टाकू शकते.

 

ही आहेत लक्षणे

1. अचानक अस्पष्ट दिसू लागणे, यामुळे आय साईटमध्ये समस्या जाणवणे.

2. कन्फ्यूजन, डोकेदुखी, छातीत वेदना आणि श्वास घेण्यास त्रास.

3. झटका येणे.

4. त्वचेवर लाल रंगाचे डाग दिसणे.

5. पायांवर अचानक सूज येणे.

6. तसेच उलटी किंवा जीव घाबरणे.

7. एंग्जायटीची तक्रार.

अशी घ्या काळजी

ब्लड प्रेशरचे कोणतेही लक्षण जाणवल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.

एखाद्या व्यक्तीला हाय ब्लड प्रेशरची जोखीम जाणवत असेल तर त्याने नियमित ब्लड प्रेशर तपासले पाहिजे.

अशा लोकांनी आदर्श प्रकारे वर्षातून एकदा ब्लड प्रेशरची तपासणी केली पाहिजे.

हाय ब्लड प्रेशर हेल्दी आहार, योग्य जीवनशैली आणि औषधांद्वारे कंट्रोल करता येऊ शकते.

रोज एक्सरसाइज करणे, वजन योग्य राखणे, हेल्दी डाएट, तणाव न घेणे आणि धूम्रपान सोडल्याने सुद्धा हाय ब्लड प्रेशर नियंत्रित केले जाऊ शकते.

Web Title :- High Blood Pressure | 7 signs your blood pressure is extremely high

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

SBI ग्राहकांचा प्रश्न – खात्यात किती रुपये ठेवण्याची आवश्यकता? जाणून घ्या याचे योग्य उत्तर

Coronavirus in India | ऑगस्टमध्ये सातत्याने वाढत आहेत कोरोनाच्या नवीन केस, कालच्या तुलनेत 4 % वाढीसह आली सुमारे 45 हजार प्रकरणे

Tokyo Olympics | बजरंगाची ‘कमाल’ ! किर्गिस्तानच्या अरनाजरवर केली ‘मात’