High Court | उच्च न्यायालयाकडून ‘मोक्का’तून बाबा बोडकेसह तिघांची निर्दोष मुक्तता

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – High Court | पुण्यातील (Pune) एका तरूणाच्या खुनप्रकरणी बाबा बोडके (Baba Bodke) याच्यासह तिघांची उच्च न्यायालयाने (High Court) नुकतीच निर्दोष मुक्तता केली आहे. प्रतिबंधात्मक कारवाई (prevention action) म्हणून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा maharashtra organised crime control act (मोक्का) mokka लागू होऊ शकत नाही असा निर्वाळा देखील न्यायालयाकडून करण्यात आला आहे.

कमलाकर उर्फ बाबा किसन बोडके Kamlakar alias Baba Kisan Bodke (रा. साप्रस, आळंदी रस्ता), एकनाथ उर्फ पप्पू मच्छिंद्र गायकवाड Eknath alias Pappu Machhindra Gaikwad (रा. ताडीवाला रस्ता) आणि सोमनाथ उर्फ आप्पा भगवान शिंदे Somnath alias Appa Bhagwan Shinde (रा. गवळी आळी, मुंढवा) अशी मोक्कातून मुक्त केलेल्यांची नावे आहेत. बाबा बोडकेसह (Baba Bodke) इतरांविरूध्द पौड रस्त्यावर (Paud Road) 9 मार्च 2003 मध्ये झालेल्या श्याम शिंदेच्या खूनाचा (Shyam Shinde Murder Case) आरोप होता. बाबा बोडके आणि इतरांची गुन्हेगारी पार्श्वभुमी असल्याने त्यांच्याविरूध्द पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती.

पोलिसांकडून (Pune Police) मोक्का (Mokka) लावण्यात आल्यानंतर त्यांनी मोक्का कारवाईला
उच्च न्यायालयात (High Court) आव्हान दिले होते. सरकार पक्ष आणि आरोपींच्या वकिलांना जोरदार युक्तीवाद झाला.
न्यायाधीश साधना जाधव (Judge Sadhana Jadhav) आणि न्यायाधीश एन.आर. बोरकर (Judge N.R. Borkar) या उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे.
सदरील निकालपत्र हे शुक्रवारी (दि. 13 ऑगस्ट 2021) जारी करण्यात आले आहेत.
दरम्यान, ज्यावेळी पुणे पोलिसांकडून (Pune Police) बाबा बोडके आणि इतरांविरूध्द मोक्काची कारवाई करण्यात आली होती त्यावेळी प्रचंड खळबळ उडाली होती.

 

Web Title : High Court | High Court acquits three including Baba Bodke from ‘Mocca’

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update