High Court | प्रेमाचा अर्थ महिला शरीरसंबंधासाठी तयार असा आहे का? हायकोर्टाने सुनावला निर्णय

तिरुवनंतपुरम : वृत्तसंस्था केरळ हायकोर्टने (High Court) गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडच्या रिलेशनशिप (Girlfriend-Boyfriend Relationship) वर म्हटले आहे की, प्रेम असण्याचा अर्थ हा अजिबात नाही की, महिलेने संबंध ठेवण्यासाठी सहमती दिली आहे. High Court निर्णय सुनावताना जस्टिस आर. नारायण पिशारदी (Justice R. Narayan Pishardi) यांनी म्हटले की, असहायतेला कुणाची सहमती म्हणता येणार नाही. सहमती आणि सबमिशनमध्ये मोठे अंतर आहे. सहमतीमध्ये सबमिशन (Submission) चा समावेश असतो परंतु चर्चेचे पालन होत नाही.केरळ हायकोर्टाने निर्णयात काय म्हटले?

 

केरळ हायकोर्टने (Kerala High Court) 26 वर्षांच्या श्याम सिवान (Shyam Sivan rape case) यांच्या अपीलावर सुनावणी केली.
ट्रायल कोर्टाने श्यामला रेपच्या एका प्रकरणात दोषी ठरवले होते.
ज्यानंतर त्याने केरळ हायकोर्टमध्ये अपील केले होते.

 

कोर्टाने (High Court) सुनावणीदरम्यान म्हटले की, दोषी श्याम आणि पीडिता एकमेकांवर प्रेम (Love) करत होते.
2013 मध्ये श्याम पीडित मुलीला कर्नाटकमधील मैसूर येथे घेऊन गेला होता.
तिथे त्याने जबरदस्तीने पीडितेसोबत शरीरीक संबंध (Physical contact) ठेवले होते.

 

श्यामने पीडितेचे सर्व दागिने सुद्धा विकले. नंतर तो पीडितेला गोव्याला घेऊन गेला जिथे त्याने पुन्हा तरूणीवर रेप (Rape) केला.
श्यामने पीडितेला धमकी दिली होती की, जर ती त्याच्या सोबत गेली नाही तर तो तिच्या घरासमोर आत्महत्या करेल.

 

विरोध न करणे सहमती नव्हे – हायकोर्ट

 

कोर्टाने पुढे म्हटले की, जरी काही ठिकाणी पीडितेने श्यामला विरोध केला नाही परंतु यास संबंध (Intercourse)
ठेवण्यासाठी सहमती मानता येऊ शकत नाही.
ते एकप्रकारचे पॅसिव्ह सबमिनश होते कारण पीडितेजवळ कोणताही पर्याय नव्हता.

 

मात्र, केरळ High Court ने POCSO अंतर्गत खालच्या न्यायालयाने दिलेली शिक्षा रद्द केली कारण घटनेच्या वेळी पीडितेच्या वयाची माहिती मिळू शकली नव्हती.
परंतु जस्टिस पिशारदी यांनी आपल्या आदेशात म्हटले की, श्याम दोषी आहे आणि त्याला आयपीसी कलम 366 आणि 376 (अपहरण आणि बलात्कार) अंतर्गत शिक्षा होईल.

 

Web Title : High Court | love does not mean woman is ready for physical relationship kerala high court POCSO act marathi news policenama

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pradhan Mantri Jan Dhan Yojana | IIT च्या रिपोर्टमध्ये दावा – SBI ने आतापर्यंत परत केले नाहीत जन-धन खातेधारकांकडून वसूल केलेले 164 कोटी

Pune Crime | दारु अड्ड्यावर येणाऱ्या ग्राहकांना दिल्या शिव्या; मालकाने केला कामगाराचा खून, प्रचंड खळबळ

Jalgaon District Bank Elections | चक्क माघारी जाहीर केलेल्या उमेदवार आल्या निवडून; माजी आमदार अरुण पाटील यांचा झाला ‘गेम’

Nawab Malik | ‘कबूल है, कबूल है, कबूल है…’ ! नवाब मलिकांचा समीर वानखेडेंवर मध्यरात्री ‘फोटोबॉम्ब’