Jalgaon District Bank Elections | चक्क माघारी जाहीर केलेल्या उमेदवार आल्या निवडून; माजी आमदार अरुण पाटील यांचा झाला ‘गेम’

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – जळगाव जिल्हा बँक निवडणुकीचे (Jalgaon District Bank Elections) मतमोजणी सुरु असून त्यात रावेर विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघात धक्कादायक निकाल पहायला मिळाला आहे. त्यात महाविकास आघाडीच्या उमेदवार जनाबाई गोंडू महाजन (Janabai Gondu Mahajan) या अवघ्या एका मताने विजयी (Jalgaon District Bank Elections) झाल्या आहेत. त्यांनी माजी आमदार आणि अपक्ष उमेदवार अरुण पाटील (Former MLA Arun Patil) यांचा पराभव केला आहे. गंमत म्हणजे मतदान होण्यापूर्वी जनाबाई महाजन यांनी अरुण पाटील यांना पाठिंबा जाहीर केला होता.

 

तरीही आज प्रत्यक्ष मतमोजणी झाली तेव्हा उलटफेर झाल्याचे दिसून आले.
एकूण ५४ मतांपैकी ३ मते बाद ठरली. जनाबाई महाजन यांना २६ तर अरुण पाटील यांना २५ मते मिळाली.
एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यामुळे महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) अडचणीत येणार असे बोलले जात होते. त्यातूनच जनाबाई महाजन (Janabai Mahajan) यांनी माघार घेऊन अरुण पाटील (Arun Patil) यांना पाठिंबा दिला होता. असे असले तरी प्रत्यक्ष मतदानात (Jalgaon District Bank Elections) फेर बदल झाला. खडसे यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे़ खडसे यांनी आपले वर्चस्व पुन्हा एकदा दाखवून दिले असल्याचे मानले जाते.

 

Web Title :- Jalgaon District Bank Elections | jalgoan dcc bank election result Mahavikas Aghadi candidate Janabai Gondu Mahajan wins by just one vote former MLA Arun Patil defeated by one vote only

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Digital Media | आयटी पॅनलची Fake News वर कायदा करण्याची शिफारस, हिवाळी अधिवेशनात होऊ शकते चर्चा

Nawab Malik | ‘कबूल है, कबूल है, कबूल है…’ ! नवाब मलिकांचा समीर वानखेडेंवर मध्यरात्री ‘फोटोबॉम्ब’

Amazon | धक्कादायक गौप्यस्फोट ! पुलवामा हल्ल्यासाठी वापरलेल्या रसायनांची Amazon वरुन खरेदी, CAIT चा गंभीर आरोप

Pune Crime | फुकट बिर्याणी न दिल्याने हॉटेल मॅनेजरवर कोयत्याने सपासप वार; पुण्याच्या सिंहगड रोड परिसरातील घटना