High Court | लहान मुलांसोबत ‘ओरल सेक्स’ गंभीर गुन्हा नाही – उच्च न्यायालय

प्रयागराज : वृत्तसंस्था –  High Court | एका लहान मुलासोबत घडलेल्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात आज (मंगळवारी) सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी लहान मुलांसोबत ओरल सेक्स ही गंभीर लैंगिक शोषणाची घटना नाहीये. असा महत्वपुर्ण निकाल अलाहाबाद हाय कोर्टाने (High Court) दिला आहे.

 

अलाहाबाद हाय कोर्टाने (Allahabad High Court) या प्रकरणात दोषीला सुनावण्यात आलेली 10 वर्षांची शिक्षा कमी करुन 7 वर्ष केली आहे.
त्याचबरोबर 5 हजार रुपये दंड देखील ठोठावला आहे. म्हणजेच, एका प्रकरणात सत्र न्यायालयाने (Sessions Court)
आरोपीला सुनावलेली शिक्षा हाय कोर्टाने कमी केली आहे.
अलाहाबाद उच्च न्यायालयाने अशा प्रकारचा गुन्हा पॉक्सो कायद्याच्या कलम 4 अंतर्गत दंडनीय असल्याचे मान्य केले आहे.
परंतु न्यायालयाने आपल्या निकालात हे कृत्य म्हणजे एग्रेटेड पेनेट्रेटिव सेक्शुअल असॉल्ट हा गंभीर लैंगिक हल्ला नाहीये.
त्यामुळे अशा प्रकरणात पॉक्सो कायद्याच्या कलम 6 आणि 10 अंतर्गत शिक्षा सुनावली जाऊ शकत नाही. असं कोर्टानं स्पष्ट केलं आहे.

 

नेमकं प्रकरण काय?

 

सोनू कुशवाह (Sonu Kushwaha) नावाच्या व्यक्तीने झाशी सत्र न्यायालयाच्या निर्णयाला अलाहाबाद हाय कोर्टात आव्हान दिले होते.
न्यायाधीश अनिल कुमार ओझा (Judge Anil Kumar Ojha) यांच्या एक सदस्यीय पीठाने कुशवाहच्या शिक्षेविरोधातील अपीलवर हा निर्णय सुनावला (High Court) आहे.
दरम्यान, याआधी सत्र न्यायालयाने सोनु कुशवाह याला भारतीय दंड संहिताच्या कलम 377, कलम 506 आणि पॉक्सो कायद्याच्या (POCSO Act) कलम 6 अंतर्गत दोषी ठरवले होते.

 

Web Title : High Court | pocso act oral physical relation with childrens is not serious offecnce allahabad high court marathi news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | पुण्याच्या ससून रुग्णालयातून गंभीर गुन्ह्यातील आरोपीचे पलायन

Universal Pension System | सरकारी कर्मचार्‍यांसाठी मोठी खुशखबर ! वाढू शकते निवृत्तीचे वय अन् पेन्शनची रक्कम, मोदी सरकार करतंय विचार, जाणून घ्या

Multibagger Stock | कृषी संबंधीत ‘या’ कंपनीच्या शेयरने 1 वर्षात 1 लाखाचे बनवले 3.14 कोटी रुपये