Highway Land Acquisition Scam | नॅशनल हायवेजवळ जमिनी दाखवून वाटला करोडोंचा मोबदला; औरंगाबादचा उपजिल्हाधिकारी निलंबित

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – Highway Land Acquisition Scam | राष्ट्रीय महामार्ग (National Highways) 211 च्या जमिनी प्रक्रियेत (Highway Land Acquisition Scam) औरंगाबादचे (Aurangabad News) निवासी उपजिल्हाधिकारी (Deputy Collector) शशिकांत हदगल (Shashikant Hadgal) यांना शासनाकडून गंभीर स्वरूपाच्या अनियमितता केल्याचा ठपका ठेवून निलंबित (Suspended) करण्यात आलं. शासनाचे अवर सचिव ए. जे. शेट्ये (A. J. Shettye) यांनी याबाबत निलंबनाचे आदेश काढले आहेत. हा आदेश काल (बुधवारी) सकाळी ते आदेश जिल्हा प्रशासनाकडे (District Administration) प्राप्त झाला आहे. (Deputy Collector Shashikant Hadgal Suspended)

 

शशिकांत हदगल हे 2020 साली उपविभागीय अधिकारी असताना त्यांच्या विरोधात एनएच 211 मध्ये केलेल्या भूसंपादनातील अनियमिततेप्रकरणी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर (Divisional Commissioner Sunil Kendrakar) यांच्याकडे तक्रारी केली होती.
त्याचबरोबर आयुक्तांनी माजी विभागीय उपायुक्त वर्षा ठाकूर (Varsha Thakur), डॉ. विजयकुमार फड (Dr. Vijaykumar Phad),
डॉ. पुरुषोत्तम पाटोदेकर (Dr. Purushottam Patodekar) यांची चौकशी समिती नेमली.
समितीने चौकशी अहवालामध्ये हदगल यांच्यावर ठपका ठेवण्यात आला.
त्यानंतर त्यांचे चौकशी करण्यासाठी आयुक्तांनी शासनाकडे पत्रव्यवहार केला. (Highway Land Acquisition Scam)

2021 साली शशिकांत हदगल यांची औरंगाबाद (Aurangabad News) येथे निवासी उपजिल्हाधिकारी या पदावर बदली झाली.
विभागीय चौकशी सुरू असताना त्यांची बदली झाल्यामुळे पुन्हा ते वादाच्या भोवऱ्यात अडकले.
हदगल यांनी करोडी येथील 19 शेतकऱ्यांच्या जमिनी हायवेवर दाखवून त्यांना चार कोटी 90 लाख रुपयांऐवजी अधिकचा 41 कोटी 43 लाख 15 हजार 237 रुपयांचा मोबदला दिल्याचे चौकशी समितीच्या अहवालात दिसले.
यानंतर त्यांच्याविरुद्ध काही लोकप्रतिनिधीनी गेल्या महिन्यामध्ये तक्रारी केल्यानंतर त्यांच्या निलंबनाचे आदेश शासनाकडून जारी करण्यात आले.

 

दरम्यान, धुळे – सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 (Dhule – Solapur National Highway No. 211) च्या भूसंपादन प्रक्रियेत लांबवरच्या जमिनी हायवेजवळ दाखवून 41 कोटी 43 लाख 145 हजार 237 रुपये अधिकचा मोबदला दिला.
या प्रकरणात अहवाल प्राप्त झाल्यानंतर दीड वर्षाने शासनाने हदगल यांना निलंबित केले. या सर्व प्रकरणात नेमलेल्या चौकशी समितीने औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद या 4 जिल्ह्यांतील 167 एकर जमिनीच्या भूसंपादनातील व्यवहारांची माहिती घेऊन अहवाल विभागीय आयुक्तांना सादर केला.
या अहवालात चारही जिल्ह्यांत तत्कालीन भूसंपादन अधिकारी व सहायक अधिकाऱ्यांवर दोषी असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.

 

Web Title :- Highway Land Acquisition Scam | highway land acquisition scam crores paid by showing lands near highways aurangabad residential deputy collector shashikant hadgal suspended

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा