हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या नाशिक डिव्हिजनमध्ये टर्नर पासून ते इलेक्ट्रीशिअन पर्यंतच्या 475 पदांसाठी भरती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीत लवकरच भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. ही भरती कंपनीच्या नाशिक येथील एअरक्राफ्ट डिव्हिजनमध्ये करण्यात येणार आहे. ही भरती ४७५ आयटीआय अप्रेंटिसशीप जागांसाठी आहे. यामध्ये फीटर, टर्नर पासून ते इलेक्ट्रीशिअनपर्यंतच्या पदांचा समावेश आहे.

पदांचा तपशील पुढीलप्रमाणे :
पदाचे नाव  एकूण जागा
फीटर – २१०
टर्नर – २८
मशीनिस्ट – २६
कार्पेंटर – ०३
मशिनिस्ट (ग्राइंडर) – ०६
इलेक्ट्रिशिअन – ७८
ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) – ०८
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक ०८
पेंटर (जनरल) ०५
शीट मेटल वर्कर – ०४
मेकॅनिक (मोटर व्हेइकल) – ०४
कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्राम असिस्टंट – ७७
वेल्डर (गॅस अँड इलेक्ट्रिक) – १०
स्टेनोग्राफर – ०८
एकूण पदे – ४७५

शैक्षणिक पात्रता
उमेदवाराने संबंधित ट्रेडमधील आयटीआय उत्तीर्ण केलाला असावा.

असा करा अर्ज
ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ मार्च २०२१ आहे. apprenticeshipindia.org या अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करू शकता. ही भरती प्रक्रिया नाशिक विभागासाठी राबवण्यात येणार आहे.