खराब क्रेडिट स्कोअरवरही मिळवू शकता गृह कर्ज; जाणून घ्या पध्दती

पोलिसनामा ऑनलाईन, नवी दिल्ली : बँकेकडून कर्ज घेण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे सिबिल स्कोअर. परंतु अनियमित उत्पन्न किंवा कधी हप्ता न भरल्यामुळे हा स्कोअर कमी होतो. अशा परिस्थितीत बँक कर्ज देण्यास नकार देते. अशा परिस्थितीत देखील तुम्ही गृहकर्ज घेऊ शकता. मात्र, त्यासाठी या पध्दतीचा अवलंब करावा लागेल.

कर्जासाठी आपले योगदान अधिक द्या
घर विकत घेण्यासाठी कर्जाची रक्कम कमी ठेवून आपले योगदान अधिक ठेवा. यामुळे मालमत्तेत खरेदीदाराचे योगदान वाढते आणि बँकेचा धोका कमी होतो. तसेच, ईएमआय देखील कमी आहे. यामुळे कर्ज मिळण्याची शक्यता वाढते.

अधिक कालावधीसाठी कर्ज घ्या
सामान्यत: कर्ज देण्यापूर्वी बँक तुमची ईएमआय भरण्याची क्षमता तपासते. जेव्हा कर्ज घेता तेव्हा ते जास्तीत जास्त वर्षांसाठी घ्या. यामुळे तुमची ईएमआय कमी होईल.

इतर कर्ज फेडा
आपण दरमहा किती रक्कम कर्ज देऊ शकता. आपल्याकडे इतर लहान कर्जे चालू असल्यास ती मोकळे करा. तसेच अन्य कर्जाच्या ईएमआयमुळे गृह कर्जाची ईएमआय वाढते हे लक्षात घ्या.

जोडीदाराचेही सहकार्य घ्या
जोपर्यंत चांगली कमाई करणारा सहकारी अर्जदार जोडत नाही तोपर्यंत कर्जाची रक्कम वाढणार नाही. सहकारी अर्जदार जोडल्यास कर्ज मंजूर होण्याची शक्यता वाढते.

मालमत्तेच्या हमीवर कर्ज घ्या
मालमत्तेच्या हमीवर घेतलेल्या कर्जाला सुरक्षित कर्ज म्हणतात. उदा. मालमत्ता, सोने, मुदत ठेवी (एफडी), शेअर्स, म्युच्युअल फंड किंवा पीपीएफ इत्यादी मालमत्तांवर कर्ज घेतले जाऊ शकते.

ज्या बँकेत खाते आहे तेथे अर्ज करा
ज्या बँकेत खाते आहे तेथे अर्ज करावा. जर आपले उत्पन्न नियमित नसल्यास किंवा आपली क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर बँक आपणास कर्ज देते. तसेच एफडी देखील असेल बँकेकडून कर्ज मिळवणे सोपे होते.

एनबीएफसी येथेही अर्ज करा
जर आपल्याला बँकेतून कर्ज घेण्यास त्रास होत असेल तर आपण नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी आणि गृहनिर्माण वित्त कंपनीत कर्जासाठी अर्ज करू शकता. एनबीएफसी देखील कमी क्रेडिट स्कोअर असलेल्या ग्राहकांना कर्ज पुरवतात.