घरच्याघरी चंदनाचा लेप लावा आणि सौंदर्य खुलवा ! जाणून घ्या, लेप कसा बनवायचा

पोलिसनामा ऑनलाइन – मुली चेहर्‍याचं सौंदर्य टिकवण्यासाठी अनेक सैांदर्य प्रसादने वापरतात. परंतु बर्‍याच मुलींच्या त्वच्या संवेदनशील असतात. त्वचा संवेदनशील असेल तर आपण आपल्या त्वचेसाठी चंदनाचा लेप लावू शकता. हा लेप वापरल्यास त्वचेशी संबंधित बर्‍याच समस्या दूर होतील. चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यास मदत होईल. चला तर मग जाणून घेऊया चंदन लेप कसा बनवायचा..

चंदनाचा लेप बनवण्याचे साहित्य
चंदन पावडर – १ चमचा
गुलाब पाणी – १ चमचा
कच्चे दूध – १ चमचा
हळद – एक चिमूटभर

चंदनाचा लेप कसा लावला
सर्व साहित्य एका भांड्यात टाकून मिश्रण तयार करून घ्या. तयार मिश्रण हलक्या हातांनी चेहरा आणि मानेवर लावा. १५-२० मिनिटे तसेच राहू द्या. नंतर ते कोमट पाण्याने धुवा.

लेप लावण्याचे फायदे
१)लेप लावल्यास मुरुम, डाग, सुरकुत्या दूर होतात.
२)चेहरा टवटवीत दिसेल.
३)जळलेल्या त्वचेला बरे करण्यास मदत करते.
४)कोरड्या त्वचेची समस्या दूर होते, त्वचेतील ओलावा राखण्यास मदत करतो.
५) चेहरा मऊ दिसतो.
६)थंडपणा जाणवतो.

आठवड्यातून २-३ वेळा आपण चंदनचा लेप लावू शकतो.