Honor 9xचा आज भारतात पहिला सेल, 13999 पासुन किंमत ‘स्टार्ट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Honor 9x भारतात लाँच झाला आहे. या स्मार्टफोनला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि पॉपअप सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. ऑनरच्या या लेटेस्ट फोनमध्ये 48 mp प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. आजच हा फोन खरेदीसाठी उपलब्द असणार आहे. ग्राहकांना यासोबत काही ऑफर्सही मिळणार आहे.

Honor 9x 4 GB+128 GB व्हॅरिएंटची किंमत 13999 रुपये आहे तर 6GB + 128 GB व्हॅरिएंटची किंमत 16999 रुपये इतकी आहे. ग्राहकांना Honor 9x मिडनाईट ब्लॅक आणि सफायर ब्लू कलरमध्ये उपलब्ध आहे. ग्राहकांना हा फोन आज रात्री 12 वाजल्यापासून फ्लिपकार्टवर उपलब्ध असणार आहे.

ऑफरबद्दल बोलायचं झालं तर पहिल्या सेलमध्ये Honor 9x 4GB + 128 GB व्हॅरिएंटसाठी 1000 रुपयांचा लिमिटेड डिस्काऊंट दिला जाणार आहे. अशाच प्रकारे ICICI बँक क्रेडिट कार्ड आणि कोटक महिंद्रा डेबिट किंवा क्रेडिट कार्डवर ग्राहकांना 10 टक्के सूट मिळणार आहे. 19 जानेवारी ते 22 जानेवारी पर्यंत ही ऑफर असणार आहे. याशिवाय जिओकडून 249 रुपये आणि 349 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 2200 रुपयांचे बेनिफिट्स दिले जाणार आहेत.

Honor 9x चे फीचर्स
अँड्रॉईड 9 पाय बेस्ड ओएस EMUI 9.1
6.59 इंच FHD+(1080*2340) डिस्प्ले.
– 6 GB रॅम 128 GB स्टोरेज
– hiSilicon Kirin 710 F प्रोसेसर
512 GB एक्सपांडेबल स्टोरेज
4000 mAH स्टोरेज
10 वॅट फास्ट चार्जिंग
ट्रीपल रियर कॅमेरा 48+8+2
16 Mp पॉपअप सेल्फी कॅमेरा
फिंगरप्रिंट सेन्सर

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like