11 मार्च राशीफळ : आज आहे ‘हा’ ‘शुभयोग’, ‘या’ 6 राशींना होणार प्रचंड ‘लाभ’

पोलीसनामा ऑनलाईन टीम : मेष – आज तुम्ही एखाद्या कारणामुळे कुटुंबापासून दूर जाऊ शकता, ज्यामुळे त्यांच्यासोबत वेळ घालवण्याची संधी मिळणार नाही. प्रेमसंबंधात यश मिळेल आणि प्रिय व्यक्तीला रोमान्सने खुश कराल. उत्पन्न वाढेल आणि तुम्ही नवनवीन आयडीया घेऊन पुढे जाल. दाम्पत्य जीवनात थोडा तणाव राहू शकतो. नोकरी बदलण्यासाठी प्रयत्न करू शकता.

वृषभ
आजच्या दिवशी विरोधकांना धूळ चाराल. कार्यक्षेत्रात बुद्धिमत्ता आणि वत्कृत्वाच्या बळावर यश मिळवाल आणि कौतूकही होईल. उत्पन्न खुप वाढल्याने मन आनंदी होईल. प्रेमसंबंधासाठी आजचा दिवस थोडा कमजोर आहे. परंतु, संतुष्ट राहाल. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घ्यावी लागेल.

मिथुन
आजचा दिवस संमिश्र आहे. व्यापारात केलेले कार्य यश मिळवून देईल. दाम्पत्य जीवनात चमत्कारिकरित्या प्रेम आणि आकर्षणात वाढ होईल. जोडीदार जास्तच रोमँटीक होईल. उत्पन्नात वाढ होईल. परंतु, कुटुंबात अशांतता असल्याने मन आनंदी राहणार नाही. विरोधकांना घाबरण्याची गरज नाही. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

कर्क
आजचा दिवस आरोग्याच्या दृष्टीने खुपच कमजोर आहे, यासाठी आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या. आजारापासून दूर राहा. धनहानी होण्याची मोठी शक्यता आहे. पैशांची गुंतवणूक करणे शक्यतो टाळा. जुगार आणि सट्टामध्ये पैसे कमावल्याने मन दुखी होऊ शकते. कामात चढ-उताराची स्थिती राहील. वैवाहिक जीवनात सुखप्राप्ती होईल. प्रेमसंबंधासाठी आजचा दिवस सामान्य आहे.

सिंह
आजच्या दिवशी मानसिक तणाव वाढलेला राहिल. परंतु, कामात यश मिळाल्याने मन प्रसन्न राहिल. रिस्क घेणे तुम्ही पसंद कराल आणि त्यामुळे फायदा होईल. लहान भावंडांशी संबंध चांगले होतील. त्यांच्यासोबत वेळ घालवाल. मित्रांनाही आज तुम्हाला भेटायला चांगली संधी मिळेल. तुमच्या संवाद कौशल्यात वाढ होईल, ज्यामुळे यश मिळेल.

कन्या
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. कुटुंबासाठी जास्त वेळ द्याल. वैवाहिक जीवनातील तणावातून मुक्ती मिळेल. कामात यश मिळेल. संततील सुख मिळेल, ज्यामुळे तुम्हीसुद्धा समाधानी राहाल. एखादी धनप्राप्ती झाल्याने धनलाभ होईल. शिक्षणात चांगले परिणाम मिळतील.

तुळ
आजचा दिवस अनेकबाबतीत तुमच्यासाठी चांगला आहे. दाम्पत्य जीवनात आनंद वाढेल आणि तुमच्यामध्ये प्रेम आणि आकर्षण वाढेल. एखादी नवी प्रॉपर्टी खरेदी करण्याची इच्छा होऊ शकते. तुमचे विरोधक तुमच्या समोर येण्याची हिम्मत करणार नाहीत. नोकरीत मेहनतीमुळे यश मिळेल. आरोग्याच्या बाबतीत सावध राहा. स्पर्धा परीक्षेमध्ये जबरदस्त यश मिळण्याचे योग आहेत.

वृश्चिक
आज सर्दीमुळे त्रास होऊ शकतो. यामुळे दिवसाचा कार्यक्रम बिघडू शकतो. आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. खर्चात वाढ झाल्याने आर्थिक दबाव वाढेल. मानसिक तणाव वाढेल. विरोधकही सक्रिय होतील. ज्यामुळे मानसिक शांतीचा अभाव दिसून येईल. काम आणि व्यवसायात चांगला लाभ मिळाल्याने दिवस चांगला जाईल. सर्व आव्हानांना यशस्वीपणे तोंड द्याल.

धनु
आजच्या दिवशी मानसिक तणावाला तुमच्यावर आरूढ होऊ देऊ नका, अन्यथा स्थिती बिघडू शकते. खर्च वाढतील आणि शारीरीकदृष्ट्या थोडी कमजोरी जाणवेल. वडीलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. एखाद्या दूरच्या प्रवासाला जाण्याची बातमी मिळू शकते. जी तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते. कामात बदलाची स्थिती येऊ शकते. म्हणजेच तुमच्या बदलीचे योग आहेत.

मकर
आजच्या दिवशी केलेले कार्य चांगले फळ देईल. उत्पन्नात वाढ होईल. महिला सहकारी आणि महिला बॉसचे सहकार्य तुमच्यासाठी वरदान ठरेल. कामात जबरदस्त यश मिळेल. भावंडांचे प्रेम मिळेल. प्रेमसंबंधासाठी वेळ चांगली आहे, ज्यामुळे तुमची पाचही बोटे तुपात असतील आणि तुम्ही दिवस खुप चांगला बनवाल.

कुंभ
आजचा दिवस कामात व्यस्त राहाल. कामात व्यस्त राहिल्याने दिवस कधी संपला हे कळणार नाही. कुटुंबाचे वातावरण प्रसन्न राहिल आणि सुखप्राप्ती होईल. कामात यशप्राप्ती होईल, परंतु प्रवासात सावधानता बाळगावी लागेल, यामध्ये काही समस्या येऊ शकतात. लहान भावंडांना काही अडचणी येऊ शकतात. मित्रांशी संबंध बिघडू शकतात. यासाठी जपून बोला.

मीन
आजच्या दिवशी मातेचे प्रेम उघड करून दाखवाल. कुटुंबात सुख आणि शांती राहिल. वैवाहिक जीवनात थोडा तणाव राहिल. जोडीदार एखाद्या गोष्टीवरून रागात असल्याचे दिसून येईल. कामात चांगले यश मिळेल आणि तुमचे कौतूक होईल. घरगुती खर्च वाढतील. प्रत्येक कामात कुटुंबाचे सहकार्य आणि सहयोग मिळेल.