27 नोव्हेंबर राशिफळ : मेष आणि मिथुनसह 3 राशींना मिळेल ‘आनंद’, इतरांसाठी ‘असा’ असेल दिवस

मेष
आजचा दिवस अनुकूल आहे. घरात एखादी चांगली बातमी येऊ शकते. कामात यश मिळेल, ज्यामुळे मन प्रसन्न होईल. कौटुंबिक कामे देखील होतील. आर्थिकदृष्ट्या मजबूती मिळेल. वैवाहिक जीवनात एखादा तणाव असू शकतो. मुलांसाठी वेळ चांगली आहे. प्रेमसंबंधात यश मिळेल. कायद्याच्या विरोधात काहीही करू नका, त्रास होऊ शकतो. नोकरीत बदलीचा योग आहे.

वृषभ
आजचा दिवस मध्यम आहे. मानसिक ताणतणाव वाढेल. आरोग्यही कमजोर होऊ शकते. खर्चामुळे आर्थिक स्थिती ओझे होईल. वैवाहिक जीवनासाठी दिवस चांगला आहे. परंतु सासरच्या लोकांशी वाद होण्याची शक्यता आहे. विरोधकांवर मात कराल. कार्यक्षमता उच्च असेल. ज्यामुळे काम सर्वांच्या नजरेत येईल. यामुळे फायदा आणि आनंदही होईल. कुटुंबातील सदस्यांसाठी एखादी कामाची वस्तू घेऊन येऊ शकता.

मिथुन
आजचा दिवस उत्तम आहे. नवीन साधने मिळतील, ज्यामुळे उत्पन्न वाढेल. प्रेम संबंधात यश मिळेल, परंतु घाई टाळा. प्रिय व्यक्ती म्हणणे प्रेमाने समजून घ्या. मुलांकडून आनंद मिळेल. वैवाहिक जीवनात काही आव्हाने असूनही, प्रेम राहील. कार्यक्षेत्रात बदलाचा प्रयत्न करू शकता. नोकरी मिळविण्यात यश मिळेल.

कर्क
आजचा दिवस सामान्य आहे. सर्व लक्ष कामावर असेल. चांगले परिणाम मिळतील. मालमत्तेच्या बाबतीत एखादा फायदा होईल. कुटुंबात थोडा वाद असू शकतो, परंतु तरीही परिस्थिती नियंत्रणात राहील. विरोधकांपासून सावध रहा. मुलांसाठी दिवस चांगला आहे. प्रेमसंबंधात चांगले क्षण घालवण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवनात आनंद मिळेल.

सिंह
आजचा दिवस उत्तम आहे. प्रवासाला जाण्याची संधी मिळेल, प्रवास सुखद ठरेल. मान सन्मानात वाढ होईल. कार्यक्षेत्रात हलका ताण असू शकतो. प्रेमसंबंधात सावध रहा. तिसर्‍या व्यक्तीचा प्रेमसंबंधात हस्तक्षेप अडचणीचा ठरू शकतो. आरोग्याकडे लक्ष द्या. वैवाहिक जीवन चांगले होईल. जोडीदार तुमच्या गोष्टी समजून घेईल.

कन्या
आजचा दिवस थोडा कममजोर आहे. मन अस्वस्थ होईल. मानसिक ताण वाढेल. कामात यश मिळण्याबाबत थोडी शंका वाटेल. आरोग्याबाबत सावधगिरी बाळगा. छोट्या बहिण भावंडांचे सहकार्य मिळेल. ते आर्थिक मदत करू शकतात. कुटुंबात तणाव असेल. आई-वडिलांचे आरोग्य कमजोर झाल्याने मानसिक चिंता वाढेल. कार्यक्षेत्रात सहकार्‍यांवर विश्वास ठेवणे चांगले ठरेल.

तुळ
आज चांगले परिणाम मिळतील. आनंदी व्हाल. वैवाहिक जीवनात आनंद आणि प्रेम वाढविण्याचा दिवस आहे. वैवाहिक जीवनात आकर्षण वाढेल. प्रेमसंबंधात दोघांना एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांसाठी चांगला दिवस आहे. घरी पाहुणे येऊ शकतात. मित्र मंडळींना भेटण्याची संधी मिळेल. कुटुंबातील लोकांचे सहकार्य मिळेल.

वृश्चिक
आजचा दिवस थोडा कमजोर असे शकतो. मानसिक ताण वाढ होईल. थोडा खर्चही होईल. मात्र, कोर्ट कचेरीच्या प्रकरणात विजय मिळेल. विरोधकांवर मात कराल. कार्यक्षेत्रात यश मिळेल. वैवाहिक जीवनात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. धैर्याच्या बळावर अनेक आव्हानांतूप मुक्त व्हाल. प्रवास योग आहे.

धनु
आजचा दिवस उत्तम आहे. प्रेमसंबंधात चांगले अनुभव येतील. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. अचानक संपत्ती येण्याची शक्यता आहे. एखाद्या कलात्मक कार्याबद्दल आवड वाढेल. ते उत्पन्नाचे साधन देखील बनू शकते. वडिलांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आरोग्य थोडे कमजोर राहण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे अभ्यासात खूप मन लागेल.

मकर
आजचा दिवस चांगला आहे. कामात यश मिळेल. तुमच्या गोष्टी ऐकल्या आणि समजून घेतल्या जातील. तसेच पदोन्नती होऊ शकते. कौटुंबिक जीवन शांततापूर्ण असेल. आईकडून प्रेम अधिक मिळेल. मानसिकदृष्ट्या आनंदी दिसाल. त्याचा परिणाम जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात होईल. प्रॉपर्टी घेण्यात यश मिळू शकते.

कुंभ
आजचा दिवस चांगला आहे. प्रवासाला जाऊ शकता. प्रवास आरामदायक आणि पैसे मिळविण्यासाठी उपयुक्त ठरेल. भावंडांसोबत चांगला वेळ घालवाल. भाग्य साथ देईल. विरोधक भारी पडू शकतात, म्हणून लक्ष द्या. सहकार्‍यांची मदत कार्यक्षेत्रात मान सन्मान वाढवेल. एखादा मित्राशी भेट होऊ शकते.

मीन
आजचा दिवस संमिश्र परिणाम देईल. कुटुंबात शांतता राहील. चांगल्या जेवणाचा आनंद घ्याल. जास्त गरम मसाले वापरल्याने आजारी पडू शकता. दुखापत होण्याची शक्यता आहे, म्हणून वाहन काळजीपूर्वक चालवा. वैयक्तिक प्रयत्नांतून पैसे मिळविण्यात यश येईल. संततीचे सूख आणि सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळतील. वैवाहिक जीवनात एखादा तणाव असू शकतो. जोडीदाराच्या सहायाने मान सन्मान मिळेल.