29 फेब्रुवारी रशीफळ: आज ‘या’ 6 राशींच्या ‘भाग्य’ उजळणार

पोलीसनामा ऑनलाइन – 

मेष
तुमच्यासाठी आजचा दिवस खुप चांगला आहे. कुटुंबियांचे संपूर्ण सहकार्य मिळेल. मातेकडून सुख मिळेल तसेच धनलाभ होईल. कामात स्थिती चांगली राहिल. तुमची लवकरच बदली होण्याचे योग आहेत. आरोग्याच्या बाबतीत आजचा दिवस खुपच कमजोर आहे. दाम्पत्य जीवनात आनंद राहिल. प्रेमसंबंधासाठी दिवस सामान्य आहे.

वृषभ
आजचा दिवस थोडा कमजोर आहे. कारण आज तुमचा खर्च वाढेल. तुमचे आरोग्य कमजोरी राहिल आणि थकवा जाणवेल. कुटुंबातील कोणीतरी प्रवासासाठी जाईल. धार्मिक कार्यात मन लागेल. ऑफिसमध्ये मन कमी लागेल, यामध्ये कामात काही अडचणी येऊ शकतात. कौटुंबिक जीवनात शांतता राहिल. दाम्पत्य जीवन कमजोर राहिल. प्रेमसंबंधात चांगले परिणाम दिसून येतील.

मिथुन
आजचा दिवस ठिक आहे. उत्पन्नाच्या बाबतीत आज तुम्ही खुप लकी ठराल. आज तुम्हाला चांगला लाभ होईल. मानसिक आनंद लाभेल. प्रेमसंबंधात आज यश मिळेल. आपल्या प्रिय व्यक्तीसोबत आनंदाचे क्षण घालवाल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन लागेल. संततीला सुख लाभेल, ज्यामुळे तुम्ही संतुष्ट होऊ शकता. एखाद्या कलात्मक कार्यात स्वत:ला अजमावू शकता आणि त्यातून धनसुद्धा मिळवू शकता.

कर्क
आजचा दिवस थोडा कमजोर आहे, यासाठी संपूर्ण लक्ष आपल्या कामावर केंद्रीत करा. कामात खुप मेहनत करावी लागेल. कौटुंबिक जीवन चांगले राहिल आणि आई-वडीलांचे सुख मिळेल. आरोग्य थोडे कमजोर राहू शकते. जास्त व्यस्त राहण्यापेक्षा थोडावेळ स्वत:साठी काढा. प्रेमसंबंधात एखादी नवी गोष्ट आनंदाचे कारण होईल. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला एखादी भेट देऊन खुश करू शकता.

सिंह
आजचा दिवस तुमच्यासाठी खुप चांगला आहे, यासाठी दिवसाचा चांगला उपयोग करून घ्या. आज विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण प्राप्त करण्याच्या दिशेने यश मिळेल. प्रेमसंबंधासाठी आजचा दिवस खुप चांगला आहे. दाम्पत्य जीवनात काही समस्या जाणवू शकतात. आज ऑफिसमधील काम तुमच्यासाठी काहीतरी आनंदवार्ता घेऊन येऊ शकते. आरोग्य चांगले राहिल.

कन्या
आजचा दिवस थोडा चढ-उताराचा आहे. धनाच्या बाबतीत वेळ थोडी कमजोर आहे. उत्पन्नात घसरण होऊ शकते आणि एखाद्या गुंतवणुकीसाठी जोखीम घेणे नुकसानकारक ठरू शकते. विवाहित लोकांसाठी दाम्पत्य जीवन आनंदी राहिल. कौटुंबिक जीवनात दिवस चांगला जाईल. सासरच्यांशी भेटगाठी होतील आणि संबंध दृढ होतील. कामासाठी दिवस सामान्य आहे.

तुळ
आजचा दिवस तुमच्यासाठी खुपच फायद्याचा आहे. व्यापारात प्रयत्न केल्याने गती मिळेल आणि व्यापार वाढू शकतो. विवाहितांना जोडीदाराचे सहकार्य मिळेल. कौटुंबिक जीवनात सदस्यांचे सहकार्य मिळेल. प्रवासासाठी दिवस चांगला आहे. समाजात मान सन्मान वाढेल. प्रेमसंबंधासाठी दिवस अनुकूल नाही, यासाठी प्रिय व्यक्ती नाराज होणार नाही, याची काळजी घ्या.

वृश्चिक
आजचा दिवस तुमच्यासाठी खुप कमजोर आहे. कामात उशीर होऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला थोडी अडचण होऊ शकते. मानसिक दबाव जाणवेल. खर्चसुद्धा वाढतील, ज्याच्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. दाम्पत्य जीवनात तणाव राहू शकतो. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीकडे मनातील गोष्टी व्यक्त करू शकता. आरोग्याकडे लक्ष द्या आणि कामात चांगले परिणाम मिळतील.

धनु
आजचा दिवस तुमच्यासाठी खुप चांगला आहे. आर्थिकदृष्ट्या चांगले परिणाम दिसून येतील. गुंतवणुकीत चांगले परिणाम मिळतील. चांगला लाभ मिळेल. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवाल. शिक्षणात अडथळे येतील. दाम्पत्य जीवनात सुखप्राप्ती होईल. कामात मन थोडे कमी लागेल आणि कुटुंबाकडे जास्त लक्ष द्याल. यामुळे कामाचा दबाव वाढले.

मकर
आजचा दिवस चढ-उताराचा आहे. कुटुंबासोबत आज वेळ घालवाल आणि सदस्यांचे सहकार्य मिळेल. कामात चांगले परिणाम दिसून येतील. खर्च वाढेल. खिशावर ताण येईल. तुमचा जोडीदार आणि घरातील इतर सदस्यांमध्ये चांगला ताळमेळ दिसून येईल. सर्वजण एकत्र कुठेतरी फिरण्यासाठी जाऊ शकतात.

कुंभ
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. कामात चांगले परिणाम मिळतील. यासाठी केलेल्या प्रवासातून यश मिळेल. एखाद्या प्रवासासाठी गेल्याने मन आनंदीत होईल आणि यातून काही नवे लाभ होऊ शकतात. यामुळे व्यापारात गती येईल. उत्पन्न वाढेल. तरीसुद्धा खर्चाचे ओझे तुमच्यावर राहिल. कामात यश मिळेल.