29 नोव्हेंबर राशिफळ : कुंभ आणि मीनसह 3 राशींसाठी ‘सूवर्णदिन’, असा असेल रविवार

मेष
आजचा दिवस अनुकूल आहे. कौटुंबिक जीवनात आनंद मिळेल. कामात मेहनतीचे चांगले फळ मिळेल. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. प्रेमसंबंधांसाठीही दिवस चांगला आहे. भाग्याची साथ मिळेल. कामात अडथळे येतील. तीर्थयात्रेला जाऊ शकता. धार्मिक विचार मनात येतील. खर्च होईल.

वृषभ
आजचा दिवस अनुकूल आहे. मानसिकदृष्ट्या बळकट राहाल. प्रत्येक गोष्टीत यश मिळेल. कामात प्रयत्न यशस्वी होतील. विश्वासार्हता वाढेल. तुमचे वजन वाढेल. आरोग्य कमजोर होईल. वैवाहिक जीवनासाठी दिवस चांगला आहे. प्रेमसंबंधासाठी सामान्य दिवस आहे. कुटुंबाच्या गरजा पूर्ण कराल. घरगुती सामान खरेदी करून आणाल.

मिथुन
आजचा दिवस नाजूक आहे. महत्वाच्या कामात उशीर झाल्यामुळे त्रास होईल. खर्च वाढल्यामुळे मन थोडे दु:खी होईल, तरीही उत्पन्न वाढेल, ज्यामुळेछोटे खर्च करू शकाल. लव्ह लाइफसाठी दिवस खूप चांगला ठरणार आहे. आज रोमँटिक मूडमध्ये असाल. वैवाहिक जीवनात एखादा तणाव राहील. कामात जास्त मेहनत करण्याची आवश्यकता आहे. व्यापारासाठी दिवस फायदेशीर ठरेल.

कर्क
आजचा दिवस मध्यम परिणाम देईल. उत्पन्न वाढल्यामुळे मन प्रसन्न होईल. कामांत चांगला धनलाभ होईल. कामाकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. कारण इकडे-तिकडे वेळ घालवणे योग्य होणार नाही. वैवाहिक जीवनासाठी दिवस सामान्य आहे. जोडीदार समर्पणाच्या भावनेने काम करेल. लव्ह लाइफसाठी दिवस खूप सर्जनशील आहे. प्रिय व्यक्तीस आनंदी करण्यात कसलीही कसर सोडणार नाही. कौटुंबिक वातावरणामुळे आनंद होईल. आरोग्याची काळजी घ्या. विरोधकांपासून सतर्क रहा.

सिंह
आज दिवस आव्हानात्मक वाटेल. कामात पूर्ण लक्ष केंद्रित कराल, ज्यामुळे कामे होतील. कौटुंबिक वातावरण देखील चांगले राहील. लव्ह लाइफमध्ये काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. प्रिय व्यक्ती भांडण करू शकतो. वैवाहिक जीवनासाठी चांगला दिवस आहे. व्यवसायात जोडीदाराचा सुद्धा संपूर्ण पाठिंबा मिळेल. कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने पैसे मिळतील. नोकरीत बदली होण्याची दाट शक्यता आहे. जुन्या मित्राची भेट होईल.

कन्या
आजचा दिवस अनुकूल आहे. भाग्याची पूर्ण साथ मिळेल. तरीही सूख भोगण्यासाठी खूप पैसा खर्च कराल, ज्यामुळे आर्थिक परिस्थिती कमजोर होऊ शकते. गुप्त पद्धतीने केलेल्या खर्चाने सामाजिक प्रतिमा खराब होऊ शकते. कौटुंबिक वातावरण थोडे अशांत राहू शकते. कामात जास्त लक्ष देऊन आणि जास्त मेहनतीने काम करावे लागेल. विरोधकांपासून सावध आणि सतर्क रहा. लव्ह लाईफसाठी दिवस थोडा कमजोर आहे. विवाहित लोकांच्या जीवनात आनंद राहील.

तुळ
आजचा दिवस थोडा नाजूक असेल. आरोग्यात अशक्तपणामुळे स्थिती थोडी त्रासदायक होऊ शकते. कामात चढ-उतारांना सामोरे जावे लागेल. भाग्य प्रबळ नसल्याने सावधगिरीने काम करा. प्रेमसंबंधात अडचणी येऊ शकतात. कुटुंबातील दुराव्यामुळे त्रास होऊ शकतो. भावंडांकडून अडचणी कमी होतील. वैवाहिक जीवनात प्रेम आणि रोमान्सची संधी मिळेल. व्यवसायात वाढ होण्याची चिन्हे आहेत.

वृश्चिक
आजचा दिवस खूप अनुकूल आहे. विवाहित जीवनासाठीही दिवस चांगला आहे. जोडीदारावर प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळेल. व्यवसायातही चांगले परिणाम मिळतील. कुटुंबाचे वातावरण आशावादी राहील. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. करिअरच्या बाबतीत चांगला दिवस आहे. कामात केलेले प्रयत्न सार्थकी ठरतील. भाग्यावर अवलंबून बसण्याऐवजी मेहनत करणे आवश्यक आहे. प्रेमसंबंधात थोडी निराशा होऊ शकते. प्रिय व्यक्तीची भेट होण्याची शक्यता कमी आहे.

धनु
आजचा दिवस थोडा नाजूक आहे, म्हणून प्रत्येक गोष्टीत काळजी घ्या. आरोग्य कमजोर राहू शकते. आजारी पडू शकता. खर्च वाढेल. कामात चांगले परिणाम मिळतील. सोबत काम करणार्‍यांशी चांगले वागा. कुटुंबात एखादा तणाव असू शकतो. प्रेमसंबंधात प्रेम आणि रोमान्सची संधी मिळेल. वैवाहिक जीवनासाठी दिवस सामान्य आहे. जोडीदारावर राग दाखवू नका.

मकर
आजचा दिवस अनुकूल आहे. संततीबाबतची कामे कराल, संततीकडून आनंद मिळेल. मन प्रसन्न होईल. उत्पन्नही वाढेल. कुटुंबाचे वातावरण देखील खूप आनंदित राहील. लोकांना भेटण्याची संधी मिळेल. खर्च किंचित जास्त होईल, ज्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनासाठी दिवस सामान्य आहे. लव्ह लाइफसाठी दिवस चांगला आहे. दुसर्‍या नोकरीची संधी मिळू शकते.

कुंभ
आजचा दिवस शुभ आहे. लक्ष कौटुंबिक गरजांवर असेल. घरातील खर्चावर लक्ष केंद्रित कराल. उत्पन्न वाढेल. मालमत्तेचा फायदा होईल. मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे. कामात प्रयत्न अर्थपूर्ण ठरतील. व्यवसाय वाढेल. खर्च थोडा होऊ शकतो, पण उत्पन्न चांगले असल्याने चिंता करण्याची काही गरज नाही. तब्येत सुधारेल. विवाहित जीवन चांगले असेल. जुन्या मित्रांना भेटून आनंद होईल. लव्ह लाइफसाठी दिवस कमजोर आहे. प्रिय व्यक्तीला आनंदी करण्यासाठी तिच्या मनातील इच्छा पूर्ण करा.

मीन
आजचा दिवस सामान्य आहे. प्रवासाला जाऊ शकता. प्रवास फायदेशीर ठरेल. पैशाचा फायदा होईल. कुटुंबात एखाद्या गोष्टीवरून गरमागरम चर्चा होऊ शकते, परंतु त्यापासून दूर रहाणे चांगले. वैवाहिक जीवनासाठी दिवस थोडा कमजोर आहे. लव्ह लाइफमध्ये आज परीक्षा होऊ शकते यासाठी सावध रहा. कामात चांगले परिणाम मिळतील. मनोबल वाढेल, ज्यामुळे कामात यश मिळेल.

You might also like