6 मार्च राशीफळ : ‘या’ 7 राशी लोकांच्या जीवनात येईल आनंदाला ‘बहर’

पोलीसनामा ऑनलाइन –

मेष
आजचा दिवस तुमच्यासाठी महत्वपूर्ण आहे. कामात आज अनुुकूलता दिसून येईल. आज खुप रोमँटीक मूडमध्ये राहाल आणि यशसुद्धा मिळेल. प्रिय व्यक्तीला घेऊन फिरायला जाऊ शकता. कुटुंबात काही समस्या येतील, आई-वडीलांचे आरोग्य बिघडू शकते. काही लोक तुमच्या प्रॉपर्टीबाबत वाद निर्माण करण्याची शक्यता आहे, त्यांच्यापासून सावध राहा.

वृषभ
आजचा दिवस तुमच्यासाठी उन्नतीचा आहे. छोट्या प्रवासातून काही नवीन नाती बनतील. कुटुंबात आनंद राहिल. नातेवाई आणि मित्रांशी संबंध वाढवाल. सहकार्‍यांसोबत चांगले वागल्याने कामात यश मिळेल. दाम्पत्य जीवनात जोडीदाराच्या मदतीने एखादा लाभ होऊ शकतो.

मिथुन
आजचा दिवस पैशाच्या बाबतीत तुमच्यासाठी खुप चांगला आहे. चांगला धनलाभ होण्याचे योग आहेत. सासरकडूनही एखादी शुभवार्ता समजेल, यामुळे मन आनंदीत होईल. रागावर नियंत्रण ठेवले तर यश सहज हाती लागेल. कामात स्थिती तुमच्या बाजूने राहिल. कुटुंबातील लहानांपासून सुख मिळेल. आजचा दिवस अनुकूल आहे. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्ती तिचे प्रेम तुमच्याकडे व्यक्त करेल. यामुळे आनंदी व्हाल.

कर्क
तुमच्यासाठी आजचा दिवस चढ-उताराचा आहे. खर्च होईल, पण उत्पन्नसुद्धा वाढेल. आरोग्य कमजोर होऊ शकते. मानसिक तणावातून आता मुक्ती मिळणार आहे. वाहन सावधगिरीने चालवा. दुर्घटना होण्याची शक्यता आहे. दाम्पत्य जीवनात स्थिती सुधारले. एकमेकांच्या जवळ याल. कौटुंबिक जीवन चांगले राहिल. प्रेमसंबंधात कडवटता येईल.

सिंह
तुमच्यासाठी आजचा दिवस थोडा कमजोर आहे. कारण तुम्ही मानसिकदृष्ट्या तणावात राहाल. खर्चसुद्धा वाढेल आणि उत्पन्न त्या तुलनेत कमी होईल. जसजसा दिवस सरकेल, तुमची स्थिती सुधारेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. प्रॉपर्टीच्या प्रकरणात लाभ मिळेल. कामात स्थिती पूर्णपणे तुमच्या बाजूने राहिल. दाम्पत्य जीवनात आणि प्रेमसंबंधात आजचा दिवस खुप चांगला आहे.

कन्या
तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. कामात तुमचा प्रभाव राहिल आणि बॉस सोबत संबंध सुधारतील. चांगले उत्पन्न मिळेल. व्यापारासाठी केलेला प्रवास यश देईल. आणि फायदा होईल. प्रेमसंबंधात तुम्ही नशीबवान ठराल. भरपूर प्रेम मिळेल. दाम्पत्य जीवनात जोडीदाराच्या माध्यमातून लाभ होण्याचा योग आहे. कौटुंबिक जीवनात समस्या येऊ शकते.

तुळ
तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. परंतु, थोडा आव्हानांचा असणार आहे. बुद्धीच्या बळावर त्यातून मार्ग काढाल. पैशाच्याबाबतीत दिवस चांगला आहे. वडीलांची प्रकृती बिघडू शकते. तुमचे आरोग्य सुधारेल. कुटुंबात अनुकूलता राहिल. प्रेमसंबंधात प्रेममय दिवस आहे. प्रिय व्यक्तीचे पूर्ण सहकार्य मिळेल. दाम्पत्य जीवनात थोडा तणाव सहन करावा लागले.

वृश्चिक
तुमच्या चिंता वाढतील आणि खर्चही वाढेल. तुम्ही तुमच्या सुखसुविधांवर एवढा खर्च कराल की, तुम्हाला प्रश्न पडेल की, गरजेसाठी पैसा कुठून आणायचा. कामात आज वादविवाद होऊ शकतो. कुटुंबातील वातावरण सुद्धा आज चांगले राहणार नाही. प्रेमसंबंधात जीवस चांगला आहे. दापम्पत्य जीवनात प्रेम वाढेल. भाग्याच्या सहाय्याने काही नवीन कामे होतील.

धनु
आजचा दिवस खुप चांगला आहे. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीशी संबंध खुप चांगले होतील. प्रेम वाढल्याने आनंदी होऊ शकता. दाम्पत्य जीवनात तणाव राहिल. संततीच्या बाबतीत चिंता वाटेल. भाग्याची साथ मिळेल. कुटुंबाच्या दबावामुळे काही निर्णय बदलावे लागतील. कामात आजचा दिवस चांगला आहे. आरोग्य चांगले राहिल. आजारातून सुटका मिळेल.

मकर
कुटुंबात सुखशांती राहिल. सर्वजण एकमेकांवर प्रेम करतील. कामात आज चांगले परिणाम दिसून येतील. तुमचे कौतूक होईल परंतु, तुमच्यासोबत काम करणारे षडयंत्र रचू शकतात. यासाठी सावध राहा. दाम्पत्य जीवनात दिवस चांगला आहे. प्रेमसंबंधात दिवस सामान्य आहे. भाग्याची साथ कमी राहिल.

कुंभ
प्रवासाला जाण्यासाठी दिवस शुभ आहे. ज्यामुळे कुटुंबात आनंद बहरेल. एखादी खुशखबर मिळू शकते. दाम्पत्य जीवनात तणाव वाढेल. जोडीदाराच्या गैरसमजामुळे वाद होऊ शकतो. खर्च वाढतील. प्रेमसंबंधात दिवस चांगला आहे. कामात तुमची पद्धत लोकांना पसंत पडेल. कौतूक होईल.

मीन
आजच्या दिवसासाठी तुम्ही एखादा खास प्लॅन बनवून ठेवाल, ज्यामुळे उत्पन्नात वाढ होईल. सासरच्या लोकांची गाठभेट घ्याल. प्रेमसंबंधात निराशा होऊ शकते. दाम्पत्य जीवनात जोडीदार मनातील गोष्टी व्यक्त करेल, ज्यामुळे तुम्ही त्यास समजून घेऊ शकता. कामात चढ-उतार राहतील.