12 मार्च राशीफळ : ‘या’ 4 राशींना होणार धनलाभ, खिशात येईल पैसा, इतरांसाठी असा आहे शुक्रवार

पोलीसनामा ऑनलाइन टीम –
मेष
आज एखादे परिवर्तन होऊ शकते. कार्यक्षेत्रात झालेल्या परिवर्तनामुळे तुम्ही घाबरत नाही, परंतु सरकार आणि व्यवस्थेकडून काही बदल होऊ शकतात ज्यास धैर्याने तोंड द्याल. बंधू-भगिनींच्या सल्ल्याने सर्व कामे आज पूर्ण होतील. सासरच्या बाजूकडील कोणताही व्यक्तीशी व्यवहार टाळा, अन्यथा संबंध बिघडू शकतात. संततीच्या भविष्याबाबत जागरूक रहा.

वृषभ
आजचा दिवस कार्यक्षेत्रात काहीशी निराशा आणू शकतो, मात्र कठोर मेहनत करून ती निराशा दूर करावी लागेल. नेहमी इतरांवर विश्वास ठेवून काहीतरी मिळवण्याची इच्छा बाळगता पण हे फार काळ चालत नाही. आज पैशाची कमतरता भासू शकते. परंतु काळजी करू नका कारण ती फार काळ टिकणार नाही. आज शेजार्‍यांशी वाद टाळा.

मिथुन
आज शत्रू प्रबळ असू शकतो, ते कामात अडथळे आणू शकतात, ज्यामुळे तुम्ही ध्येयापासून जाऊ शकता. उत्साह कमी होईल आणि प्रगतीत अडथळा येईल. म्हणून गरजेनुसार स्वत:ला जुळवून घ्या ज्यामुळे तुमचा कोणीही फायदा घेऊ शकणार नाही. कुटुंबात वाढदिवस वगैरे असू शकतो, ज्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य व्यस्त दिसतील. आज संध्याकाळी धनलाभाचा योग आहे.

कर्क
आज व्यवसायात अनेक संधी मिळतील, ज्या प्रगतीच्या मार्गावर घेऊन जातील. ज्यामुळे आर्थिक स्थितीची चिंता कमी करावी लागेल. अशा संधी ओळखल्या पाहिजेत. समाजसेवा केल्यास फायदा होईल. जर यासाठी एखाद्या संस्थेत सहभागी व्हायचे असेल तर ते उत्तम होईल. आज जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांना भविष्य अधिक चांगले करण्यासाठी काही नवीन स्पर्धांमध्ये भाग घ्यावा लागेल.

सिंह
आज नोकरी, व्यवसायात अधिकार्‍यांची साथ मिळेल. यामुळे एक नवीन ऊर्जा निर्माण होईल. गोड वागण्याने व्यवसायाच्या सभोवतालचे वातावरण आनंदी कराल, ज्यामुळे काही शत्रूदेखील उद्भवू शकतात. विद्यार्थी थोडा वेळ आज मनोरंजनात घालवतील. संततीबाबतचे कर्तव्य पार पाडाल.

कन्या
आजचा दिवस अधिक विचार करायला लावेल. कारण कामकाजाची स्थिती अनुकूल नाही. कुटुंबात मालमत्तेची सुरू असलेली वाटणी स्वीकारली पाहिजे, जी मनास दुखवेल. भाऊ किंवा बहिणीच्या लग्नासाठी प्रस्ताव येऊ शकतो. संध्याकाळी एखाद्या धार्मिक ठिकाणी भेट देऊ शकता.

तुळ
कार्यक्षेत्रात स्वतः काम करावे लागेल. सर्व कामे इतरांकडे सोपवण्याची आवश्यकता नाही, कारण लोक त्याचा फायदा घेऊ शकतात. आज संध्याकाळी कुटुंबातील सदस्यांसमवेत वेळ घालवाल, ज्यामुळे समाधान लाभेल. वडिलांच्या आरोग्यामध्ये थोडी घसरण होऊ शकते, म्हणून काळजी घ्या. कुटुंबात मालमत्तेबाबत वाद उद्भवू शकतात.

वृश्चिक
आज व्यवसायाबाबत थोडे चिंतीत असू शकता, कारण एकामागून एक तोटा सहन करावा लागू शकतो, परंतु काळजी करू नका. आज कामे पूर्ण करण्यास थोडा विलंब होऊ शकतो. आर्थिक स्थितीबद्दल चिंता असू शकते. विद्यार्थी त्यांच्या भविष्यातील योजनांसाठी मेहनत घेतील. धर्मकार्यात रस वाढेल.

धनु
आजचा दिवस उत्तम फलदायक आहे. सर्व महत्वाची कामे सुरू होती, ती आज पूर्ण झाल्याने भरपूर आनंद होईल आणि वेळ चांगला जाईल. तुमच्या आर्थिक स्थितीसाठी चांगली बातमी असेल. पैसे कोठे अडकले असतील तर ते हातात येतील. ज्यामुळे खुश व्हाल. प्रेमसंबंध मजबूत होतील.

मकर
आजचा दिवस खूप गोंधळाचा असेल. एकीकडे जोडीदारासाठी भेटवस्तू खरेदी करण्याची घाई होईल, तर दुसरीकडे, कार्यक्षेत्रात काम करण्यासाठी जास्त दबाव येईल. योग्य वेळी आज तुमचे वाहन देखील तुम्हाला साथ देणार नाही, यासाठी समजूतदारपणा दर्शवावा लागेल. दानधर्मासाठी काही पैसे खर्च करू शकता.

कुंभ
आज मित्रांसोबत व्यवसायाबद्दल चर्चा करू शकता. त्यांचा सल्ला व्यवसायासाठी फायदेशीर ठरेल. थोडा अशक्तपणा जाणवेल, म्हणून आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. मोठ्या कालावधीपासून एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी हा सर्वोत्तम दिवस आहे. जोडीदाराचा सल्ला प्रभावी ठरणार आहे.

मीन
व्यवसायाबाबत गांभीर्याने विचार कराल. बर्‍याच काळापासून व्यवसायाकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्रास सूरू आहे, आत ते समजेल, परंतु त्यासाठी आळस सोडावा लागेल, तरच शक्य आहे. जोडीदारासाठी एखादी भेट खरेदी करू शकता, ज्यामुळे त्यांना आनंद होईल. विद्यार्थ्यांना आज शैक्षणिक क्षेत्रात थोडी निराशा वाटू शकते.