Photos : श्रुती मराठेनं शेअर केला Hot अवतार, ट्रोलर्स म्हणाले- ‘लस घेण्यासाठी ड्रेस’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अभिनेत्री श्रुती मराठे (Shruti Marathe) ही मराठी फिल्म इंडस्ट्रीतील सुंदर अभिनेत्रीपैंकी एक आहे. श्रुती अ‍ॅक्ट्रेस (Shruti Marathe) आहे आणि मॉडेलही आहे. आपल्या सौंदर्यामुळे ती लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करते. श्रुतीनं चाहत्यांसोबत अनेकदा तिचा बोल्ड आणि हॉट अवतारही शेअर केला आहे. यावेळी ती बोल्डनेसमुळंच चर्चेत आली आहे. परंतु काहींनी तिला यासाठी ट्रोल केलं आहे.

श्रुतीनं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं ब्लॅक अँड व्हाईट शर्ट घातला आहे. यात तिचा एख खांदा उघडाच दिसत आहे. तसं तर श्रुती यात खूप बोल्ड आणि हॉट दिसत आहे. पंरतु काहींना तिचा हा लुक पचला नाही असं दिसतंय.

काही लोकांनी श्रुतीच्या फोटोवर कमेंट करत लिहिलं आहे की, लस घ्यायला ड्रेस. काहींनी तिला लस घेतली का मॅडम असा प्रश्नही केला आहे. अद्याप तिनं ट्रोलर्सला कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. काहींना तुलाचा हा लुक आवडल्याचंही दिसत आहे.

श्रुतीचे हे फोटो सोशलवर प्रचंड व्हायरल झाले आहेत. तिचा हा अवतार चाहत्यांनाही खूप आवडला आहे. अनेकांनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

श्रुतीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सनई चौघडे या सिनेमातून तिनं आपल्या करिअरला सुरुवात केली होती. हा मराठी सिनेमा यशस्वीही ठरला. यानंतर श्रुती मराठे लोकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. सिनेमांव्यतिरीक्त श्रुतीनं अनेक मराठी टीव्ही मालिकेतही काम केलं आहे. तिनं आजपर्यंत 20 हून अधिक सिनेमे केले आहेत. श्रुतीने हिंदी सोबतच तमिळ, कन्नड सिनेमातही काम केलं आहे. इंदिरा विजहा या सिनेमातून तिनं तमिळमध्ये पदार्पण केलं होतं. प्रेम सूत्र या तमिळ सिनेमातही तिनं काम केलं आहे. टीव्ही मालिकेत श्रुती खूपच यशस्वी ठरली.