नको असलेली प्रेग्नंसी रोखण्यासाठी ‘डायफ्रेम’चा वापर कसा कराल, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   डायफ्रेम ज्यास गर्भनिरोधक पडदा किंवा सिलिकॉन कपच्या नावाने सुद्धा ओळखले जाते. हे महिलांसाठी गर्भनिरोधक म्हणून काम करते. सिलिकॉन कप शुक्राणु नाशकासह योनीत लावला जातो, जो गर्भाशय ग्रीवा कव्हर करतो. डायफ्रेमचा जर योग्य प्रकारे वापर केला तर तो 94 टक्केपर्यंत गर्भनिरोधकाचे काम करतो. हा लावण्यास खुप सोपा आहे आणि याच्या वापरानंतर सेक्सचा आनंद निश्चिंत होऊन घेता येऊ शकतो. स्तनदा मातासुद्धा याचा वापर करू शकतात. डायफ्रेम कशाप्रकारे काम करतो, ते जाणून घेवूयात –

डायफ्रेमचा वापर कसा कराल

माय उपचारनुसार, डायफ्रेमचा वापर करतेवेळी शुक्राणुनाशकाचा सुद्धा वापर केला जातो. हे तेव्हा केले जाते जेव्हा शारीरीक संबंध ठेवायचे असतात. डायफ्रेमचा वापर कशाप्रकारे करावा, याची माहिती चांगल्या प्रकारे करून घेतली पाहिजे.

शारीरीक संबंध ठेवण्याच्या 6 तास अगोदर डायफ्रेम आपल्या योनी ठेवा आणि शारीरीक संबंधानंतर 6 ते 12 तासानंतर ते काढा. लक्षात ठेवा कधीही 24 तासापेक्षा जास्त वेळ डायफ्रेम योनीत ठेवू नका.

डायफ्रेम लावण्याची पद्धत

डायफ्रेमच्या कपमध्ये आणि त्याच्या रीमच्या जवळपास सुमारे एक मोठा चमचा शुक्राणुनाशक टाका. नंतर ते आपल्या हाताने अर्धे दुमडून योनीत ठेवा आणि बोटाच्या माध्यमाने योनीत डायफ्रेम जितके शक्य होईल तेवढ्या दूरपर्यंत आत सरकवा. जेव्हा डायफ्रेमद्वारे गर्भाशय ग्रीवा जाणवेल, तिथपर्यंत ते ठेवा. जर गर्भाशय ग्रीवा जाणवली नसेल तर डायफ्रेम काढून त्यामध्ये पुन्हा शुक्राणुनाशक टाकून योनीच्या आत टाकण्याचा प्रयत्न करा. जर 6 तासांच्या आतच शारीरीक संबंध ठेवायचे असतील तर डायफ्रेम आताच राहू द्या आणि बोटांद्वारे योनीत आणखी शुक्राणुनाशक टाकू शकता.

डायफ्रेम काढण्याची पद्धत

डायफ्रेम काढताना योनीत बोटाच्या मदतीने हुक प्रमाणे डायफ्रेमला बाहेरच्या बाजूला ओढा. डायफ्रेम काढताना ही गोष्ट विशेष लक्षात ठेवा की, डायफ्रेम फाटू नये. डायफ्रेम काढल्यानंतर तो चांगल्याप्रकारे साबणाने धुवून सुकवा.

डायफ्रेमचा वापर केल्यानंतरचा अनुभव

*  डायफ्रेमचा वापर करणार्‍या महिला आणि तिच्या जोडीदाराला तो जाणवत नाही.

*  डायफ्रेमच्या वापरानंतर काही महिलांना योनीत संसर्ग होण्याचा धोका असू शकतो.

*  काही महिलांना शुक्राणुनाशक आणि डायफ्रेममुळे अ‍ॅलर्जीची समस्या होऊ शकते.

डायफ्रेम वापरताना अशी घ्या काळजी

*  डायफ्रेमचा वापर तेव्हाच करा, जेव्हा योनीत कोणताही संसर्ग नसेल. जर योनीत संसर्ग असेल तर याच्या वापराने समस्या होऊ शकते.

*  डायफ्रेमचा वापर नेहमी शुक्राणुनाशक वापरल्यानंतर करा. अन्यथा ते काम करणार नाही.

*  हे लावण्याची योग्य पद्धत माहिती असणे आवश्यक आहे. जर डायफ्रेमचा वापर चुकीच्या पद्धतीने करण्यात आला, तर ते प्रभावी ठरणार नाही.

*  जर हे लावता येत नसेल तर एखाद्या महिलांनी एखाद्या गायनॅकोलॉजिस्टचा सल्ला घेऊ शकतात.