‘WhatsApp’ नंतर आता जाणून घ्या ‘Paytm’ अ‍ॅप आपली किती माहिती कलेक्ट करते

पोलीसनामा ऑनलाईन : चिनी कंपनी अलीबाबा समर्थित भारतीय अ‍ॅप पेटीएम (Paytm) चे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी लोकांना व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) चा वापर करू नये अशी विनंती केली आहे. व्हॉट्सअ‍ॅप ऐवजी सिग्नल (Signal) वापरण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. पण यामागील कारण काय आहे?

गोपनीयतेसंदर्भात व्हॉट्सअ‍ॅप आजकाल वादात आहे. पण पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा व्हॉट्सअ‍ॅपबद्दल यापूर्वी बोलले आहेत. खास करून तेव्हापासून जेव्हा व्हॉट्सअ‍ॅपने पेमेंट सर्व्हिस सुरू करण्याची घोषणा केली होती. कारण की पेटीएमसाठी व्हॉट्सअ‍ॅप एक डायरेक्ट प्रतिस्पर्धी आहे, यामुळे पेटीएमचे विजय शेखर शर्मा हे पूर्वीपासून व्हॉट्सअ‍ॅपवर आरोप लावत आले आहेत. ते म्हणाले होते की व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट सुरक्षित असणार नाही, कारण यामध्ये लॉग इन लॉग आउट सारखा कुठलाही प्रकार नाही.

तर आता तुम्हाला याची कल्पना आली असेलच की पेटीएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी लोकांना व्हॉट्सअ‍ॅप न वापरण्याचा सल्ला का देत आहेत आणि त्यामागील हेतू काय आहे. आता गोपनीयतेचा प्रश्न बघितला तर तुम्हाला पेटीएम अ‍ॅप कोणता डेटा संकलित करते हे माहित आहे का? जर तुम्हाला माहिती नसेल तर त्याबद्दल जाणून घेऊया.

अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवर अलीकडेच प्रायव्हसी लेबलची सुरुवात केली गेली आहे. अ‍ॅप स्टोअरवर कोणत्याही अ‍ॅपला सर्च करून आपण हे पाहू शकता की ते अ‍ॅप आपल्याकडून कोणकोणती माहिती घेते. अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरमध्ये रेकॉर्ड केलेल्या पेटीएमच्या प्रायव्हसी लेबलनुसार हे अ‍ॅप वापरकर्त्याचे स्थान ट्रॅक करते. या व्यतिरिक्त, पेटीएमकडे कॉन्टॅक्ट इनफो आणि कॉन्टॅक्टची डिटेल्स असणे तर आवश्यक आहे कारण याद्वारे अकाउंट तयार केले जाते आणि आपण पैसे भरता.

पेटीएम अ‍ॅप कार्यक्षमतेसाठी आपला हा डेटा संकलित केला जाऊ शकतो

अ‍ॅप स्टोअरच्या प्रायव्हसी लेबलनुसार हे अ‍ॅप वापरकर्त्यांची आर्थिक माहिती, स्थान, संपर्क माहिती (नाव आणि फोन नंबर), संपर्क आणि वापरकर्ता सामग्री जसे की फोटोज आणि व्हिडिओंचा अ‍ॅक्सेस घेऊ शकते.

युजरचा डेटा सरकारबरोबर शेअर केल्याचा आरोप पेटीएमवर आहे

विशेष म्हणजे, 2018 मध्ये कोबरा पोस्टच्या स्टिंगनंतर, रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की पेटीएम सरकारसोबत युजरचा डेटा शेअर करते. या स्टिंग व्हिडीओमध्ये पेटीएमचे वरिष्ठ अधिकारी असे सांगताना दिसून आले की पेटीएम सरकारच्या मोहिमेला प्रोत्साहन देते. पेटीएमचे सीईओ विजय शेखर शर्मा यांचे लहान भाऊ देखील कोबरा पोस्टच्या या स्टिंगमध्ये होते. या स्टिंग ऑपरेशननंतर पेटीएमला विरोधी पक्षांनी लक्ष्य केले. मात्र, त्यानंतर पेटीएमने एक निवेदन जारी केले होते.

पेटीएमने दिलेल्या निवेदनात असे म्हटले होते की वापरकर्त्यांचा डेटा 100% सुरक्षित आहे आणि लॉ इनफोर्समेंट एजन्सींच्या विनंतीनुसार त्यांना डेटा दिला जाऊ शकतो. परंतु याशिवाय डेटा कोणत्याही थर्ड पार्टला शेअर केला जात नाही. कोबरा पोस्टच्या या स्टिंग ऑपरेशननंतर पेटीएमने सोशल मीडियावर ट्रेंडिंग सुरू केली होती आणि विरोधी पक्षाने पेटीएमवर बरेच आरोप केले. राहुल गांधी यांनी ट्वीट करून पेटीएम ला पे टू पीएम म्हटले होते.

व्हॉट्सअ‍ॅप सरकारबरोबर डेटा शेअर करतो का?

जिथपर्यंत व्हॉट्सअ‍ॅप चॅटचा प्रश्न आहे, तर कंपनीचे म्हणणे आहे की वापरकर्त्यांचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट कोणाशीही शेअर केले जात नाही. व्हॉट्सअ‍ॅप चॅटवर एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन आहे, त्यामुळे याचा अ‍ॅक्सेस व्हॉट्सअ‍ॅप किंवा कोणत्याही थर्ड पार्टीला मिळू शकत नाही. तथापि, टेक कंपन्या वापरकर्त्यांचा मेटा डेटा सरकारी एजन्सीच्या विनंतीवर त्यांना देऊ शकतात. मेटा डेटामध्ये वापरकर्त्यांची मूलभूत माहिती असते, परंतु त्यात कम्यूनिकेशन डेटा नसतो.