2000 च्या ‘फाटलेल्या’ नोटांच्या बदल्यात बँक देते ‘इतके’ रुपये, जाणून घ्या कशा आणि कुठं बदलायच्या फाटलेल्या नोटा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फाटलेल्या नोटांच्या संदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (नोट रिफंड) नियम 2009 मध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. नियमांनुसार, नोटच्या स्थितीच्या आधारावर लोक देशभरातील आरबीआय कार्यालये आणि नियुक्त बँक शाखांमध्ये विकृत किंवा दोषपूर्ण नोटा बदलू शकतात. जर आपल्याकडे देखील फाटलेली नोट असेल तर काळजी करू नका. आज आम्ही सांगणार आहोत की आपण या फाटलेल्या नोटा कुठे आणि कशा बदलू शकता आणि त्या बदल्यात बँक आपल्याला किती पैसे देते.

येथे बदला फाटलेल्या नोटा
आपण आपल्या जवळच्या कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन या नोटांना बदलू शकता. परंतु ही सुविधा प्रत्येक बँकेत उपलब्ध नाही. बँक कर्मचारी आपली नोट बदलण्यास नकार देऊ शकत नाहीत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) स्पष्टपणे सर्व बँकांना नोटा बदलण्याची सूचना दिली आहे. तसेच त्यांना त्यांच्या शाखांमध्ये या सुविधेचा बोर्ड देखील लावावा लागेल असेही बजावले आहे.

फाटलेल्या 2000 च्या नोटच्या बदल्यात मिळतात इतके पैसे
आरबीआयच्या नियमांनुसार, नोट किती फाटली हे तिच्या स्थितीवर अवलंबून असते. रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, 2000 रुपयांची नोट 88 चौरस सेंटीमीटर (cm) असेल तर पूर्ण पैसे मिळतील तर 44 चौरस सेंटीमीटर वर निम्मेच पैसे मिळतील.

बँका कोणतीही फी घेत नाहीत
फाटलेल्या नोटांच्या देवाणघेवाणीसाठी बँक तुमच्याकडून कोणतेही शुल्क घेत नाही. ही सेवा बँकेमार्फत विनामूल्य पुरविली जाते. तथापि, बँक अशा नोटा बदलून देण्यास नाकारू शकते ज्या अत्यंत खराब किंवा अधिक प्रमाणात जळालेल्या असतील. जर बॅंकेला शंका आली की नोट हेतुपूर्वक कापली गेली आहे, तर ती नोट बदलली जाणार नाही.

परतावा किती असेल ?
50 रुपये, 100 रुपये आणि 500 रुपयांच्या जुन्या फाटलेल्या नोटाच्या संपूर्ण परताव्यासाठी आपली नोट दोन भागांमध्ये विभागली जाणे आवश्यक आहे, त्यातील एक भाग संपूर्ण नोटच्या 40 टक्के किंवा त्याहून अधिक भागाला व्यापेल.