Jio Postpaid सिम कार्डला असे बदला Prepaid मध्ये, घरबसल्या करता येईल ‘हे’ काम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी खासगी टेलिकॉम कंपनी रिलायन्स Jio आपल्या युजर्संना पोस्टपेड अन् प्रीपेड अशी दोन्ही सुविधा देते. पोस्टपेडच्या तुलनेत प्रीपेड सेवा ही थोडीशी स्वस्त आहे. जिओच्या सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लानची किंमत 199 रुपये आहे. तर प्रीपेडमध्ये यापेक्षा कमी खर्च येतो. तसेच काही युजर्स बिल पेमेंट जास्त येत असल्याच्या तक्रारी करत आहेत. त्यामुळे ते प्रीपेड पसंत करतात. त्यामुळे कुणाला जर पोस्टपेड वरून प्रीपेड मध्ये यायचे असेल तर या स्टेप्स फॉलो करा.

Jio पोस्टपेड वरून Jio प्रीपेड मध्ये करायचे हे काम ऑनलाइन केले जाऊ शकते. तसेच Jio स्टोर वरून जाऊन सुद्धा करता येते. मात्र सध्या देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अनेक राज्यात कडक निर्बंध, लॉकडाऊन लागू केला आहे. त्यामुळे लोकांना घराबाहेर पडता येत नाही. त्यामुळे तुम्ही घरी बसून Jio पोस्टपेड वरून जिओ प्रीपेड मध्ये स्विच करू शकता. कंपनी आपल्या अधिकृत वेबसाइटवर ही सुविधा देते. जाणून घ्या ही पद्धत.

पोस्टपेड मधून प्रीपेड मध्ये करताना या स्टेप्स वापरा

1) सुरुवातीला तुम्हाला Jio च्या अधिकृत वेबसाइट (www.jio.com) वर जा. आणि Sim Home Delivery ऑप्शन वर क्लिक करा.
2) त्यानंतर आता तुमचे नाव आणि जिओ पोस्टपेड नंबर टाका.
3) दोन्ही डिटेल्स टाकल्यानंतर Generate OTP ऑप्शनवर क्लिक करा.
4) तुमच्या पोस्टपेड नंबरवर ओटीपी येईल. याला टाकून व्हेरिफाय करा.
5) I am interested in Prepaid ऑप्शनला सिलेक्ट करा आणि Port to Jio ऑप्शन वर क्लिक करा.
6) सिम कार्डची डिलिवरीसाठी तुमचा संपूर्ण पत्ता द्या.
7) पत्ता दिल्यानंतर Submit Port to Jio request वर क्लिक करा.
8) प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 3-4 दिवसात जिओ एग्झिक्युटीव तुमच्या घरी येईल.
10) आधार कार्ड किंवा ओळखपत्र दाखवल्यानंतर तुम्हाला प्रीपेड सिम दिले जाईल.