झुरळांपासून सुटका हवीय ? जाणून घ्या ‘हे’ 4 सोपे घरगुती उपाय !

घरातील झुरळं पळवून लावण्यासाठी विविध उपाय केले जातात. परंतु तरीही त्याचा फायदा होताना दिसत नाही. मात्र अनेकदा यासाठी घरगुती उपाय केले जात नाहीत. आज आपण असेच काही घरगुती उपाय पाहणार आहोत.

1) ज्या भागात झुरळांचा वावर जास्त आहे त्या ठिकाणी कोपऱ्यांमध्ये तमालपत्राची पान चुरगळून ठेवावीत. ती उडून जाऊ नये यासाठी तुम्ही कपड्यात बांधूनही ठेवू शकता. याचा वास खूप उग्र असतो.

2) चवीला तीक्ष्ण आणि तसाच वास असलेली लवंग जशी आजारपणात गुणकारी ठरते तशीच ती झुरळांना पळवून लावण्यासाठीही मदत करते. त्यामुळं झुरळं ज्याठिकाणी दिसतात त्या ठिकाणी लवंग ठेवावी.

3) बोरिक पावडर आणि साखर समप्रमाणात घेऊन हे मिश्रण एकत्र करून घरातील कोपऱ्यांमध्ये ठेवावं. खास करून ज्याठिकाणी अंधार आणि ओलावा आहे अशा जागेवर ही पावडर ठेवावी.

4) घरात झुरळं फिरत असलेल्या ठिकाणी कडुलिंबाच्या पानांचं तेल किंवा पावडर टाकावी. कडुलिंबाच्या पानांमध्ये असलेल्या उग्र दर्पामुळं झुरळं लवकरच मरतात. जर झुरळांपासून सुटका हवी असेल तर हे उपाय एकदा नक्की ट्राय करून पहा.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल ॲडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची ॲलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.