Good News ! तब्बल 46800 रुपयांपर्यंत Tax वाचवा ! जाणून घ्या ‘ही’ खास योजना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अनेक लोक कर वाचवण्यासाठी प्रयत्न करत असतात. आज आपण अशाच एका खास योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. प्राप्तीकर कलम 80 सी अन्वये तरतुदीनुसार करदात्यांनी आपला कर वाचवण्यासाठी कायमच उपाययोजना केल्या आहेत. या कलमांअतर्गत कर वाचवण्यासाठी गुंतवणुकीचे पर्याय देण्यात आले आहेत.

अनेक गुंतवणूकदार असे आहेत ज्यांना इक्विटी लिंक्ड सेव्हींग स्कीम (ELSS) अंतर्गत बचत करणं योग्य पर्याय वाटतो. परंतु यात कसा आणि काय फायदा होतो हे अनेकांना माहिती नाही. आज आपण याचबद्दल माहिती घेणार आहोत.

BOI AXA इक्विटी लिंक्ड सेव्हींग्ज योजनेअंतर्गत गुंतवणूक आयकर कलम 80 सी अतंर्गत तुम्ही जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांची बचत करू शकता. म्हणजेच आताच्या करवाढीच्या 4 टक्के सेस सोबत दरवर्षी 46800 रुपये कर तुम्हाला भरावा लागणार आहे.

अशी कराल बचत
ELSS ही इक्विटी म्युच्युअल फंड कॅटेगरी आहे. यात गुंतवणूकदाराला गुंतवणुकीवर सवलत दिली जाते. 46800 रुपयांची कर बचत गणना ही सर्वात जास्त कर स्लॅबवर अवलंबून आहे. उपकरांसह करावर 4 टक्के शिक्षण सेसला जोडलं तर वर्षाकाठी 1.5 लाखांवर कर बचत 31.2 टक्के किंवा 46800 रुपयांची सेव्हींग होईल.

इक्विटी लिंक्ड सेव्हींग स्कीमचे फायदे –
1) ELSS फंडामध्ये लॉक इनचा कालावधी हा 3 वर्षांचा आहे. 3 वर्षांचा लॉक इन म्हणजे खरेदीच्या तारखेपासून 3 वर्षे पूर्ण होण्याधी तुम्ही खरेदी केलेल्या युनिट्सची विक्री करू शकत नाहीत.

2) ELSS मध्ये गुंतवणुकीवर होणारा लाभ आणि रिडप्शन करून मिळालेली रक्कम ही पूर्णपणे करमुक्त असते.

3) यात गुंतवणूक केली तर चांगला परतावाही मिळतो. जो महागाई दराच्या अधिक असतो.

4) म्युच्युअल फंडात एसआयपीमार्फत गुंतवणुकीची सुविधा देण्यात आली आहे.