कमी भांडवलात सुरु करा Tissue Paper चा व्यवसाय आणि कमावा लाखो रुपये, सरकारकडून अनुदान देखील

पोलीसनामा ऑनलाईन टीम नवी दिल्ली: बदलत्या जीवनशैलीमुळे भारतात गेल्या काही वर्षांत कागदी नॅपकिन्सचा वापर वाढला आहे. त्यामुळे साहजिकच Tissue Paper च्या मागणीतही प्रचंड वाढ झाली आहे. अलीकडे घर, हॉटेल्स ते अगदी कार्यालयांमध्ये Tissue Paper ही जणू जीवनावश्यक बाब झाली आहे. कोरोनाच्या काळात तर Tissue Paper चे महत्त्व आणखीनच वाढले आहे. त्यामुळे Tissue Paper चा वापर केवळ शहरांपर्यंत मर्यादित न राहता अगदी ग्रामीण भागातही होऊ लागला आहे. त्यामुळे अगदी कमी भांडवलात टिश्यू पेपरची निर्मितीचा व्यवसाय करू शकतो. याचा लघुद्योगात समावेश असल्याने या व्यवसायासाठी सरकारकडून अनुदानही दिले जाते. कोरोनाकाळत अनेकजण बेरोजगार झाले आहे. त्यांच्यासाठी हि चांगली संधी आहे.

टिश्यू पेपरची निर्मितीचा व्यवसाय सुरु करण्यासाठी किती लागते भांडवल ?
टिश्यू पेपरच्या निर्मितीचा कारखाना सुरु करण्यासाठी तीन ते साडेतीन लाख रुपयांचे भांडवल लागते. पंतप्रधान मुद्रा योजनेतंर्गत तुम्ही कोणत्याही बँकेत कर्जासाठी अर्ज करु शकता. तुम्हाला अगदी कमी व्याजदराने कर्ज मिळेल. तुमच्याकडे ३.५० लाखांची रक्कम असल्यास बँक तुम्हाला टर्म लोन म्हणून ३.१० लाख तर वर्किंग कॅपिटल म्हणून ५.३० लाख रुपयांचे कर्ज देऊ शकते.

जागा आणि उत्पादन
कारखाना सुरु करण्यासाठी तुमची स्वत:ची जागा किंवा इमारत असल्यास उत्तम. अन्यथा तुम्ही एखादी जागा भाड्याने घेऊ शकता. उत्पादनाच्याबाबती बोलायचे झाल्यास तुम्ही प्रत्येकवर्षी १.५० लाख किलो टिश्यू पेपर्सची निर्मिती करू शकता. त्यानंतर तुम्ही प्रतिकलो ६० ते ६५ रुपये दराने टिश्यू पेपर्स विकू शकता. या गतीने गेल्यास वर्षाकाठी तुमच्या व्यवसायात १ कोटीची उलाढाल होऊ शकते.

कोणत्या गोष्टींवर करावा लागतो खर्च?
टिश्यू पेपर तयार करण्यासाठी लागणाऱ्या यंत्रासाठी ४.५० लाख रुपये
कच्च्या मालासाठी प्रत्येक महिन्याला साधारण ७ लाख रुपये
२१ जीएसएम टिश्यू पेपरच्या १२.५ टनासाठी ७ लाख रुपये
शाई आणि कंझ्युमेबल गोष्टींसाठी १० हजार रुपये
पँकिंग मटेरियलसाठी ३००० रुपये
दैनंदिन खर्चासाठी महिन्याला ७.५० लाख रुपये
कर्मचाऱ्यांचे वेतन, वीज, वाहतूक, टेलिफोन, स्टेशनरी आणि इतर देखभालीसाठी जवळपास ५० ते ६० हजार एकूण व्यवसायासाठी १२ लाख रुपये