Video : बांद्रा पोलीस ठाण्यात पोहोचली हृतिक रोशनची Ex वाईफ सुजैन खान ! जाणून घ्या नेमकं प्रकरण काय

पोलिसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार हृतिक रोशन (Hrithik Roshan) ची एक्स वाईफ सुजैन खान (Sussanne Khan) ही अलीकडेच मुंबईतील बांद्रा पोलीस ठाण्यात (Bandra Police Station, Mumbai) पोहोचली आहे. सुजैन सोबत पूर्ण टीम स्पॉट करण्यात आली. तिच्या सोबत पोलीसही दिसत आहे.

पोलीस ठाण्यात का आली सुजैन ?

सुजैन खान एक प्रसिद्ध इंटीरियर डिझायनर आहे. बांद्रा पोलीस ठाण्याचं रिनोवेशन पाहण्यासाठी ती पोलीस ठाण्यात आली होती. तिच्या निगरानीखालीच पोलीस ठाण्याच्या रिनोवेशनचं काम सुरू आहे.

सुजैनचे फोटो अन् व्हिडीओ सोशलवर व्हायरल

सुजैनचे काही फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. अनेकजण तिला पोलीस ठाण्यात जाताना पाहून अवाक् झाले होते. परंतु त्यानंतर त्यांना यामागील कारणही समजलं.

स्वत:चंही घर केलंय डिझाईन

सुजैन खाननं याआधीही स्वत:च घर डिझाईन केलं होतं. मुंबईच्या जुहूमध्ये तिचं आलिशान घर आहे. बिल्डींगच्या 15 व्या मजल्यावर तिचं हे घर आहे. सुजैन सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. आपले फोटो व्हिडीओ तसेच कामाचे सॅम्पलही ती शेअर करत असते.