Coronavirus : ‘कोरोना’च्या भीतीमुळं ‘भाईजान’ सलमान आणि हृतिकनं ‘कॅन्सल’ केली अमेरिका टूर !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोना व्हायरसची भीती दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. बॉलिवूड सेलेब्सही भीतीये छायेत आहेत. अलीकडेच कोरोनाला जागतिक महामारी म्हणून घोषित करण्यात आलं आहे. यानंतर आता बॉलिवूड स्टार सलमान खाननं आपली दबंग टूर पोस्टपॉन केली आहे. इतकेच नाही तर बॉलिवूड स्टार हृतिक रोशनचाही अमेरिकेत एक फॅन इव्हेंट होणार होता. परंतु आता हा इव्हेंट कॅन्सल करण्यात आला आहे.

ट्रेड ॲनलिस्ट तरण आदर्शनुसार, सलमान खानचा हा इव्हेंट 3 एप्रिल 2020 ते 12 एप्रिल 2020 पर्यंत कॅनडा आणि अमेरिकेत होणार होता. कोरोनामुळं हा इव्हेंट पोस्टपॉन करण्यात आला आहे. समलान खानची ही कॉन्सर्ट त्याचा भाऊ सोहैल खाननं आयोजित केली होती.

सलमान खान या इव्हेंटद्वारे अटलांटा, न्यू जर्सी, बॉस्टन, टोरंटो, डलास, हॉस्टन, सैन जोस आणि सिएटल या ठिकाणी जाणार होता. सलमानच्या मॅनेजरनुसार, या वेळी ट्रॅवल करणं ठिक नाही. कोरोनाचा धोका कमी झाल्यानंतर कॉन्सर्टनची नवीन तारीख सांगितली जाईल.

हृतिकनं कॅन्सल केला इव्हेंट
हृतिक रोशनच्या कोरोनामुळं अमेरिकेत होणारा फॅन इव्हेंट रद्द केला आहे. हृतिकचा हा इव्हेंट 10 एप्रिल 2020 रोजी सुरू होणार होता. हृतिक 9 दिवसांपर्यंत शिकागो, वाशिंग्टन, न्यू जर्सी, डलास, अटलांटा आणि सैन होजे याा ठिकाणी जाणार होता.