Hruta Durgule | अभिनेत्री ऋता दुर्गुळे पडली होती सहकलाकाराच्या प्रेमात; मुलाखतीमध्ये केले कबुल

पोलीसनामा ऑनलाइन – मराठी सिनेविश्वात आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री ऋता दुर्गुळे (Hruta Durgule) ही आघाडीची अभिनेत्री आहे. ऋताच्या छोट्या पडद्यावरील मालिकेतील कामांमुळे ती घराघरांत पोहचली. त्यानंतर तिने मराठी चित्रपटांमध्ये उत्कृष्ट कामे केली. आज ऋताचा लाखोंचा चाहता वर्ग असला तरी या सर्वांना माहिती नसलेल्या एका गोष्टीचा तिने खुलासा केला आहे. ती एकदा सहकलाकाराच्या प्रेमात पडली होती हे तिने आता कबुल केले आहे. (Hruta Durgule)

अभिनेत्री ऋता दुर्गुळे हीने अनेक हीट चित्रपट दिले आहेत. अनेक कलाकारांसोबत ऋताची ऑनस्क्रीन जोडी गाजली आहे. ऋताने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिचे गमतीशीर अनुभव शेअर केले. यामुलाखती दरम्यान ऋताला विचारण्यात आले की, “तू कधी सहकलाकाराच्या प्रेमात पडली आहेस का?’ यावर तिने दिलेल्या उत्तराने सर्वांना आश्चर्यचकित केले. ती म्हणाली, “हो. पण मी त्याचं नाव नाही सांगणार.” एका प्रोजेक्टमध्ये एकत्र काम करत असताना ती तिच्या एका सहकलाकाराच्याही प्रेमात पडली होती असे तिने मान्य केले आहे.

मागील वर्षी ऋता ही प्रतीक शाह (Pratik Shah) याच्याशी विवाहबंधनात अडकली आहे. ऋताच्या लग्नाचे फोटो देखील खूप व्हायरल झाले होते. प्रतीक शाह हा एक दिग्दर्शक आहे. आतापर्यंत त्याने अनेक हिंदी मालिकांचं दिग्दर्शन केलं आहे. तर अनेकदा ऋता आणि प्रतीक (Hruta and Pratik) सोशल मीडियावर एकमेकांबद्दलचं प्रेम व्यक्त करत असतात.

‘महाराष्ट्राची क्रश’ (Maharashtra’s Crush’) अशी ओळख असलेल्या ऋता दुर्गुळे (Actress Hruta Durgule)
हीने आत्तापर्यंत फुलपाखरू, दुर्वा आणि मन उडू उडू झालं या मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे
तर अनन्या (Ananya) आणि टाइमपास 3 (Timepass 3) चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
या वर्षी ऋता दुर्गुळे ही अभिनेता वैभव तत्त्ववादी (Actor Vaibhav Tatwawaadi) बरोबर आगामी
‘सर्किट’ (circuit)या चित्रपटात झळकणार आहे. तर ऋताचा ‘कन्नी’ (‘Kanni’) हा नवीन चित्रपट देखील
लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Web Title :  Hruta Durgule | Marathi Actress hruta durgule revealed that she had fallen in love with her co star

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | वसुलीबाज कृषीमंत्र्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा; काँग्रेसची मागणी

Pune PMC News – G20 Summit | G 20 परिषदेसाठीच्या ‘विद्युत रोषणाई’च्या कामांत नियमांचे उल्लंघन ! निविदा भरण्यापुर्वीच मर्जीतील ठेकेदारांकडून लाखोंच्या कामांचा सपाटा

Maharashtra Politics News | जागा वापटाबाबत बावनकुळेंचे मोठे विधान, म्हणाले – ‘जागा वाटपाचा निर्णय…’