Maharashtra Politics News | वसुलीबाज कृषीमंत्र्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा; काँग्रेसची मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | अकोल्यात कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Maharashtra Agriculture Minister Abdul Sattar) यांच्या नावावर कृषी विभागाच्या पथकाने धाडी (Raid) टाकल्या. या पथकात अधिकारी नसलेल्या अनेक खासगी व्यक्तींचा समावेश असल्याची बाब समोर आली आहे. कृषी विभागाच्या कथित धाडीतील दीपक गवळी (Deepak Gavli) हा आपला स्वीय सहाय्यक नसल्याची प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी आहे. (Maharashtra Politics News) परंतु सत्तारांच्या शासकीय दौऱ्यातील पत्रात गवळीचा उल्लेख स्वीय सहाय्यक असा केला आहे. या प्रकारावर काँग्रेसने संताप व्यक्त केला आहे. तसेच कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची तात्काळ मंत्रीमंडळातू हकालपट्टी करावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष (Maharashtra State Congress President) नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे.

माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, अकोल्यात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नावाने धाडी टाकून व्यापाऱ्यांकडून पैसे मागितल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. (Maharashtra Politics News) या धाड पथकात सत्तार यांचा स्विय सहाय्यक दिपक गवळी याच्यासह इतर अनेक खासगी लोक होते. तर आपल्याच सांगण्यावरुन या धाडी टाकण्यात आल्या आहेत, यात काहीच चुकीचे नाही असे कृषीमंत्री स्वत:च सांगत आहेत. यावरुन ते किती निर्ढावलेले आहे हे दिसते. या वसुलीबाज कृषीमंत्र्यांची मंत्रीमंडळातून तात्काळ हकालपट्टी करा, अशी मागणी पटोले यांनी केली आहे.

पटोले पुढे म्हणाले, सत्तार यांना शेतकऱ्यांबद्दल अजिबात चिंता नाही.
त्यांनी मंत्री झाल्यापासून आतापर्यंत शेतकरी हिताचा एकही निर्णय घेतला नाही.
नैसर्गिक आपत्तीच्या (Natural Disasters) काळात शेतकऱ्यांना धीर दिला नाही,
अडचणींच्या काळात मदत केली नाही. याउलट सतत बेजबाबदार विधानं करुन शेतकऱ्यांचा आणि कष्ट करणाऱ्यांचा अवमान केला.

खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना (Farmers) खते व बियाणे वेळेवर मिळाली पाहिजे याची व्यवस्था
करण्याऐवजी कृषीमंत्री आणि त्यांचे कार्यालय धाडी घालून वसुली करण्यात गुंग आहे अतिशय गंभीर असल्याचे
पटोले म्हणाले. या वसुलीबाज कृषीमंत्र्यांची मंत्रीमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी, असेही नाना पटोले म्हणाले.

Web Title : Maharashtra Politics News | maharashtra congress nana patole demands that extrusion extortionist agriculture minister abdul sattar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : मार्केटयार्ड पोलिस स्टेशन – फिर्याद दाखल होण्यापूर्वीच पोलिसांनी पकडले चोरट्यांना

Maharashtra Politics News | अजित पवार परत आल्यामुळे बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण झालं, सामनातील अग्रलेखावरुन राष्ट्रवादीचा संजय राऊतांवर पलटवार

Nitin Gadkari Warn Contractor | ‘कामात गडबड झाल्यास मला कळवावे, त्याला रगडून टाकेल’; गडकरींचा कंत्राटदाराला थेट इशारा

NCP Chief Sharad Pawar | एकाचवेळी 2 कार्यकारी अध्यक्ष नेमण्याची गरज का? ठाकरे गटाचा अग्रलेखातून सणसणीत सवाल

Maharashtra Politics News | ‘याला चोमडेपणा म्हणतात, राऊतांनी ठाकरेंच्या कानात सांगून…’, अमित शहांवर केलेल्या टीकेला शिंदे गटाकडून प्रत्युत्तर