IAS Dr Anil Ramod Suspended | लाचखोर अतिरिक्त आयुक्त डॉ. अनिल रामोड निलंबित

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – IAS Dr Anil Ramod Suspended | लाचखोरी प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले पुणे विभागीय अतिरिक्त आयुक्त (महसूल) डॉ. अनिल रामोड (IAS Dr Anil Ramod Suspended) यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. राज्य सरकारच्यावतीने (State Government) त्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव गेल्या आठवड्यात मंजुरीसाठी सरकारकडे पाठवण्यात आला होता. तसा प्रस्ताव सरकारकडे सादर करण्यात आला. त्यानुसार राज्य सरकारने डॉ. अनिल रामोड यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.

सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील जागेचे भूसंपादनाचा मोबदला वाढवून देण्यासाठी डॉ. अनिल रामोड (Dr. Anil Ramod Suspended) यांना 8 लाख रुपयांची लाच स्वीकारताना सीबीआयच्या (CBI) पथकाने अटक (Arrested) केली होती. डॉ. रामोड हे पोलिस कोठडी नंतर न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) आहेत. त्या दरम्यान, डॉ. रामोड यांनी वकिलामार्फत न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज (Bail Application) फेटाळला आहे.

दरम्यान, 48 तासांपेक्षा अधिक पोलीस कोठडीत राहिल्याचा ठपका ठेवत अनिल रामोड यांना विभागीय आयुक्त पदावरून निलंबित करण्यात आले आहे. सीबीआयच्या मागणीनुसार विभागीय आयुक्तालयाने राज्य सरकारकडे रामोड यांच्या निलंबनाचा प्रस्ताव सरकारकडे पाठविला होता. अखेर या प्रस्तावाला मान्यता देत सरकारने रामोडच्या निलंबनाचे आदेश जारी केले आहेत.

Web Title :  IAS Dr Anil Ramod Suspended | Bribery Additional Commissioner Dr. Anil Ramod suspended

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा