IAS Officer Transfer | राज्यातील 7 सनदी (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्या; ‘PMPML’ च्या अध्यक्षपदी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची नियुक्ती

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  राज्य सरकारने मुदतवाढ दिली नसल्याने डॉ. राजेंद्र जगताप यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार बुधवारी (दि.30) सोडला होता. त्यानंतर या रिक्त पदावर कोणाची नियुक्ती होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर राज्य शासनाने लक्ष्मीनारायण मिश्रा (Laxminarayan Mishra, IAS) यांची पीएमपीएमएल नवे अध्यक्ष म्हणून शुक्रवारी (दि.9) नियुक्ती केली. सध्या मिश्रा हे रत्नागिरीच्या जिल्हाधिकारीपदाची (Ratnagiri Collector) जबाबदारी सांभाळत आहेत. राज्य शासनाने आज राज्यातील 7 सनदी (IAS Officer Transfer) अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. IAS Officer Transfer | Transfers of 7 IAS Officers in the State; Appointment of Laxminarayan Mishra as the Chairman of PMPML

 

बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आणि त्यापुढे कोठून कोठे बदली झाली.

1. व्ही.बी पाटील (V.B.Patil) – सचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय मुंबई यांची विभागीय आयुक्त, कोकण विभाग, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

2. विजय वाघमारे (Vijay Waghmare) – सह-व्यवस्थापकीय संचालक एमएसआरडीसी, मुंबई यांची सचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

3. विमला आर (Vimala R.) – नागपूर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त

4. लक्ष्मीनारायण मिश्रा (Laxminarayan Mishra) – जिल्हाधिकारी, रत्नागिरी ते पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. पुणे चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त

5. डॉ. राजेंद्र भारुड (Dr.Rajendra Bharud) – जिल्हाधकारी नंदुरबार यांना आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे येथे नियुक्त

6. जलज शर्मा (Jalaj Sharma) – अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त नागपूर, यांची जिल्हाधिकारी, धुळे येथे नियुक्ती

7. मनीषा खत्री (Manisha Khatri) – अतिरिक्त आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर ते जिल्हाधिकारी नंदुरबार येथे नियुक्ती

Web Title : IAS Officer Transfer | Transfers of 7 IAS Officers in the State; Appointment of Laxminarayan Mishra as the Chairman of PMPML

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime Branch Police | सरकारी नोकरी लावण्याच्या आमिषाने लाखोंची फसवणूक, गुन्हे शाखेकडून दीपक पांचाळला अटक

State Bank of India । 10 आणि 11 तारखेला कोट्यावधी ग्राहकांना मिळणार नाहीत ‘या’ महत्त्वाच्या सेवा; बँकेनं सांगितलं महत्वाचं कारण