ICC Ranking | अष्टपैलू क्रिकेटर्समध्ये जडेजा अव्वल स्थानी विराजमान; टॉप 5 मध्ये ‘या’ 3 भारतीयांचा समावेश

पोलीसनामा ऑनलाईन : आयसीसी दरवेळी आपली रँकिंग (ICC Ranking) जाहीर करत असते. यंदाच्या आयसीसीच्या टेस्ट रँकिंगमध्ये भारतीय खेळाडूंचा बोलबाला दिसून आला. बुधवारी जाहीर झालेल्या रँकिंगमध्ये भारताचा अष्टपैलू क्रिकेटर रविंद्र जडेजाने अव्वल स्थान पटकावले आहे. त्याच्याशिवाय या यादीमध्ये (ICC Ranking) टॉप 5 मध्ये रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल यांनी देखील स्थान पटकावले आहे. रविचंद्रन अश्विन दुसऱ्या तर अक्षर पटेल पाचव्या क्रमांकावर आहे.

गोलंदाजीच्या रँकिंगमध्ये तब्बल 1466 दिवस ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स अव्वल स्थानी होता. आता इंग्लंडचा जेम्स अँडरसन पॅट कमिन्सला मागे टाकत अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये टॉपला पोहोचणारा तो दुसरा वयस्क गोलंदाज ठरला आहे. गोलंदाजांच्या यादीमध्ये अश्विन दुसऱ्या तर जडेजा नवव्या स्थानी आहे. या यादीमध्ये अव्वल स्थान मिळवताना जेम्स अँडरसनने 87 वर्षे जुना विक्रम मोडला आहे. या यादीमध्ये 1936 मध्ये ऑस्ट्रेलियाचे क्लेरी ग्रिमेट हे टॉप रँकिंग मिळवणारे सर्वात वयस्क गोलंदाज ठरले होते .

अष्टपैलू क्रिकेटर्समध्ये रविंद्र जडेजा 460 रँकिंग (ICC Ranking) पॉइंटसह पहिल्या क्रमांकावर आहे.
तर आर अश्विन 376 रँकिंग पॉइंटसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
एकदिवसीय रँकिंगमध्ये भारताचा गोलंदाज मोहम्मद सिराज 729 पॉइंटसह अव्वल स्थानी आहे
तर टी-20 रँकिंगमध्ये फलंदाज सूर्यकुमार यादव 906 पॉइंटसह अव्वल स्थानी विराजमान आहे.

Web Title :-ICC Ranking | icc ranking ravindra jadeja on top in test all rounders three indian in five

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांच्यासह भावावर गुन्हा दाखल; शिक्षक म्हणून नोकरीचे आमिष दाखवून ४५ जणांची केली कोट्यांवधीची फसवणूक

Umesh Yadav Father Passed Away | भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या वडिलांचे निधन